Parambir Singh’s letter bomb चौकशी ‘या’ अधिकाऱ्याकडे द्या, पवारांचा मुख्यमंत्र्यांना पर्याय

Parambir Singh’s letter bomb चौकशी ‘या’ अधिकाऱ्याकडे द्या, पवारांचा मुख्यमंत्र्यांना पर्याय

परमबीर सिंग या मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची वसुली करण्यासाठीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सरकारमधील गृहमंत्र्यांवर आरोप करणे हे एक गंभीर प्रकरण आहे. त्यामुळेच या संपुर्ण प्रकरणात सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. म्हणूनच या प्रकरणात एका अशा व्यक्तीची नेमणुक होणे गरजेचे आहे, ज्या व्यक्तीला पोलिस दलात आणि प्रशासनात मान आणि आदर आहे. म्हणूनच मी या संपुर्ण प्रकरणात एका व्यक्तीचे नाव सुचवत असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. एक स्वच्छ प्रतिमेच्या पोलिस अधिकाऱ्याने या संपुर्ण प्रकऱणात चौकशी करावी असे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सुचविले असल्याचा खुलासा शरद पवार यांनी यावेळी केला. त्यावेळी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी महत्वाच योगदान दिलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचा उल्लेख त्यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यावर झालेल्या आरोपांचा तपास हा त्या पोलिस अधिकाऱ्याने करावा असे सुचवले. (Parambir Singh’s letter bomb : Sharad pawar ask cm to give enquiry of parambir singh’s letter bomb to Ex cp of Mumbai police julio-ribeiro)

शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत पोलिस दलातील एका स्वच्छ प्रतिमेच्या आणि चांगली प्रतिमा असणाऱ्या व्यक्तीकडे परमबीर सिंह यांच्या आरोपाचे प्रकरण तपासाला जावे असे मुख्यमंत्र्यांना सुचवले. त्याचवेळी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोपही अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना मुंबईतील १७०० हून अधिक बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून साधारणपणे दोन लाख ते तीन लाख या प्रमाणे वसुली करत १०० कोटी रूपये वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केला होता. पण या आरोपाची गंभीर दखल ही मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे. माझे आणि मुख्यमंत्र्यांचेही बोलणे झाले आहे. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणात मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिस दलासाठी अतिशय उत्तम सेवा दिलेले जूलिओ रिबेरो या पोलिस अधिकाऱ्याची नेमणुक या संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शरद पवारांच्या या मागणीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एक माजी पोलिस महासंचालक या संपुर्ण प्रकरणात कशी काय चौकशी करू शकतो ? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

कोण आहे जूलिओ रिबेरो ?

जूलिओ रिबेरो हे मुंबई पोलिस आयुक्त म्हणून राहिलेले आयपीएस अधिकारी आहेत. एक कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी म्हणून त्यांचा संपुर्ण पोलिस दलात दरारा होता. मुंबई पोलिस आयुक्त असताना त्यांनी तस्कर माफियांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर रिबेरो यांची नियुक्ती ही CRPF चे महासंचालक म्हणून करण्यात आली. त्यापुढच्या काळात त्यांना गुजरात पोलिस महासंचालकपदीही नियुक्ती देण्यात आली. दहशतवादाच्या समस्येने पोखरलेल्या पंजाबच्या महासंचालकपादाचीही जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. त्यांच्या पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना मानाचा असा पद्म भूषण पुरस्कारही १९८७ साली प्रदान करण्यात आला आहे.


 

First Published on: March 21, 2021 3:58 PM
Exit mobile version