NEET MDS Counselling 2021: नीट काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात, २४ ऑगस्टपर्यंत करु शकता अर्ज

NEET MDS Counselling 2021: नीट काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात, २४ ऑगस्टपर्यंत करु शकता अर्ज

NEET MDS Counselling 2021: नीट काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात, २४ ऑगस्टपर्यंत करु शकता अर्ज

एमडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट २०२१ काऊन्सेलिंग प्रक्रिया आज शनिवार २१ ऑगस्टरपासून सुरू झाली आहे. मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) द्वारे हे काउन्सेलिंग ५० % अखिल भारतीय कोटा (AIQ) आणि केंद्रीय व डीम्ड विद्यापीठे, AIIMS आणि आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज आणि संस्थांनी प्रस्तावित केलेल्या जागांसाठी होणार आहे.
MCC ची mcc.nic.in या अधिकृत वेबसाईटवरुन उमेदवारांना २० ऑगस्टपासून ते २४ ऑगस्ट दुपारी १२ पर्यंत आपला अर्ज भरता य़ेणार आहे. तर या अर्जचे शुल्क रात्री ११.५५ पर्यंत भरु शकतात.

२१ ऑगस्टचपासून नीट यूजी काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीला सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना नोंदणी करणे अनिवार्य आहे. यानंतर पसंतीक्रम भरणे आणि पुढील अन्य प्रक्रिया पूर्ण करता येतील. पहिल्या फेरीतील काऊन्सेंलिंगच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया १ सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.

कशी करायची नोंदणी?

१) नीट ऑल इंडिया काउन्सेलिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी mcc.nic.in वर रजिस्टर करावे लागेल.

२) यानंतर एमडीएस काउन्सेलिंगच्या लिंकवर क्लिर करा.

३) आता एक नवे पेज ओपन होईल.

४) यावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड चॉइस फिलिंग लिंकवर क्लिक करा.

५) यात विचारलेली सर्व माहिती भरून रजिस्टर करा. – रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक आयडी मिळेल.

६) पुढील सर्व प्रक्रियेसाठी हा आयडी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे तो सुरक्षितपणे नोंदवून ठेवा.

शिवाय ६ सप्टेंबरपासून दुसऱ्या राउंडच्या काउन्सेलिंग प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या दुसऱ्या राउंडची रजिस्ट्रेशनची यादी ९ सप्टेंबरवर निर्धारित आहे. यानंतर ७ ते १० सप्टेंबरपर्यंत चॉइस फिलिंग आणि लॉकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दुसऱ्या राउंडसाठी १३ सप्टेंबरला सीट अलॉटमेंट रिजल्ट जाहीर होईल. यासाठी उमेदवारांना १४ सप्टेंबरपासून ते १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल. NEET MDS 2021 प्रवेश परीक्षा १६ डिसेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली. याचे निकाल ३१ डिसेंबर २०२१ रोजी घोषित करण्यात आले.


Weather Alert: कोकणासह नाशिकमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा, पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’


 

First Published on: August 21, 2021 6:24 PM
Exit mobile version