NEET PG 2021: येत्या रविवारी होणारी नीट पीजीची परीक्षा स्थगित

NEET PG 2021: येत्या रविवारी होणारी नीट पीजीची परीक्षा स्थगित

NEET PG 2021: येत्या रविवारी होणारी नीट पीजीची परीक्षा स्थगित

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक परीक्षा रद्द आणि लांबणीवर गेल्या आहेत. काल (बुधवारी) सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा रद्द करण्यात आली आणि १२वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता आणखीन एक परीक्षा लांबणीवर गेल्याचे समोर आले आहे. मेडिकलच्या पद्वुत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा येत्या रविवारी १८ एप्रिलला होणार होती. पण आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख काय असेल?, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही आहे. पण जी तारीख ठरेल ती योग्यवेळी जाहीर केली जाईल, अशी माहिती ट्वीटद्वारे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. यामुळे आता एका पाठोपाठ एक परीक्षा लांबणीवर जाताना दिसत आहे. यावर्षी नीट परीक्षेसाठी जवळपास १.७ लाख विद्यार्थी बसणार होते. या परीक्षेच्या माध्यमातून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ‘कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण लक्षात घेता भारत सरकारने नीट परीक्षा २०२१ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा १८ एप्रिल रोजी होणार होती. पण आता परीक्षाची पुढील तारीख नंतर निश्चित करण्यात येईल. आमच्या तरुण मेडिकल विद्यार्थ्यांना लक्षात ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्यासाठी तरुण डॉक्टरांची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे. दरम्यान आता परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर परीक्षेची पुढील तारीख निश्चित केली जाईल.’

देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नीटची परीक्षा ऑफलाईन आयोजित केली होती. पण काही लोकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. हेच लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक केंद्र आणि राज्यांच्या बोर्डच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – रुग्णवाढीप्रमाणे बेड्सही वाढलेच पाहिजे, आरोग्यमंत्र्यांचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना इशारा


 

First Published on: April 15, 2021 8:10 PM
Exit mobile version