Nepal Plane Crash: तारा एअरच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले, नेपाळ लष्कराने दुर्घटनास्थळाचे फोटो शेअर

Nepal Plane Crash: तारा एअरच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले, नेपाळ लष्कराने दुर्घटनास्थळाचे फोटो शेअर

तब्बल सहा तासांनंतर नेपाळमधून (Nepal Tara Air plane) बेपत्ता झालेल्या विमानाचा लष्कराने शोध घेतला. हे विमान हिमालयातील मानापाथीच्या खालच्या भागात दिसले. तसेच हे विमान मुस्तांगच्या कोवांग गावात सापडले. १९ आसन असलेल्या या विमानात 4 भारतीय, 4 विदेशी आणि 13 नेपाळी प्रवासी होते. या दुर्घटनेच्या अधिक तपासानंतर सोमवारी नेपाळी खासगी एअरलाइन्सचे विमान रविवारी जिथे कोसळले ते ठिकाण शोधून काढले. नेपाळी लष्कराच्या प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ‘शोध आणि बचाव पथकांनी विमान अपघाताचे ठिकाण शोधले आहे’, असे लिहिले आहे.

पोलिस निरीक्षक राजकुमार तमांग यांच्या नेतृत्वाखालील पथक विमान अपघातास्थळी पोहोचले. या अपघातात मृत्यू झालेल्या काही प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस अवशेष गोळा करत आहेत. दरम्यान,
तारा एअरच्या विमानाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आल्याचे नेपाळ लष्कराने सोमवारी सांगितले. रविवारी मुस्तांग जिल्ह्यात बर्फवृष्टी झाल्यानंतर अपघातग्रस्त विमानाच्या शोधात तैनात असलेले सर्व हेलिकॉप्टर थांबवण्यात आले होते.

रविवारी सकाळी तारा एअरच्या विमानाने नेपाळमध्ये उड्डाण केले. तारा एअरच्या दुहेरी इंजिनच्या विमानाने सकाळी पोखराहून जोमसोमला उड्डाण केले. विमानाचा शेवटचा संपर्क सकाळी 9.55 वाजता झाला. विमान केवळ 15 मिनिटांच्या उड्डाणासाठी होते आणि त्यात 22 प्रवासी होते. 5 तास उलटूनही कोणताही सुगावा न लागल्याने विमान कोसळल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.


हेही वाचा – Rajya Sabha Elections 2022: शायद मेरी तपस्या में कुछ..,राज्यसभेची उमेदवारी डावलताच काँग्रेस नेत्यानं ट्विट करत व्यक्त केली नाराजी

First Published on: May 30, 2022 9:54 AM
Exit mobile version