भारतातून येणारा कोरोना चीन, इटली या देशांपेक्षा घातक – नेपाळ

भारतातून येणारा कोरोना चीन, इटली या देशांपेक्षा घातक – नेपाळ

योगाचा उगम नेपाळमध्ये झाला,भारत अस्तित्वातही नव्हता, पंतप्रधान ओलींचा नवा दावा

भारत आणि नेपाळमधील सीमा वादावरून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही नेपाळमधील कोरोना विषाणूसाठी भारत जबाबदार धरलं आहे. ओली यांनी नेपाळमध्ये भारतातून येणारे कोरोना विषाणूचे रुग्ण अधिक घातक असल्याचं वर्णन केले आहे. ते म्हणाले की लोकांनी भारतातून बेकायदेशीरपणे नेपाळमध्ये प्रवेश केल्यामुळे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नेपाळमध्ये बुधवारी रुग्णांची संख्या ४२७ वर पोहोचली. त्याचबरोबर नेपाळनेही भारताशी असलेल्या सीमा विवादांच्या पार्श्वभूमीवर देशाचा एक नवीन राजकीय आणि प्रशासकीय नकाशा जाहीर केला आहे.

कोविड-१९ साथीच्या विषयावर ओली यांनी मंगळवारी संसदेत सांगितलं की नेपाळमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना कोरोनाचा प्रसार रोखणं कठीण झालं आहे. ते म्हणाले, अनेक कोरोना विषाणूग्रस्त नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. विषाणू बाहेरून आला आहे कारण देशात पूर्वी नव्हता. आम्ही सीमेवर घुसखोरी रोखू शकलो नाही. ओली म्हणाले की, देशातील वाढते रुग्ण सर्वात मोठी चिंता आहे. यासाठी लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या लोकांना त्यांनी दोष दिला. विशेषत: असे लोक जे गुप्तपणे नेपाळमधून भारतात प्रवेश करत आहेत.

भारतातून येत आहे कोरोना

ओली म्हणाले, ‘भारतातून येणारा कोरोना विषाणू इटली आणि चीनहून आलेल्यांपेक्षा जास्त आहे. जे लोक बेकायदेशीरपणे भारतातून येत आहेत, ते हा विषाणू देशात पसरवत आहेत. यासाठी लोकांची चाचणी न घेता लोकांना आणण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी आणि पक्षाचे नेते जबाबदार आहेत. नेपाळ सरकार सुरुवातीपासूनच विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे आणि देश कोरोना मुक्त करणं देशाची प्राथमिकता असावी असा दावा त्यांनी केला.


हेही वाचा – ट्रम्प म्हणतात, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ही अमेरिकेसाठी अभिमानाची बाब


सीमा विवादांवरून तणाव

भारत आणि नेपाळ यांच्यात लिपुलेखमध्ये मानसरोवर लिंक रोड बनवण्यावरुन वाद झाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की भारत सरकारच्या विरोधानंतरही नेपाळ सरकारने आपल्या देशाचा एक नवीन राजकीय व प्रशासकीय नकाशा जाहीर केला आहे. या नवीन नकाशामध्ये नेपाळने आपल्या लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरा क्षेत्राचे एकूण ३३५ चौरस किलोमीटर क्षेत्र घोषित केले आहे. ओली यांनी असा आरोप केला की भारताने आपले सैन्य तेथे ठेवलं आणि ते विवादित क्षेत्र बनवलं. ते म्हणाले, १९६० च्या दशकात भारतीय सैन्याने तैनात केल्यानंतर नेपाळी लोकांनी तिथं जाणं बंद करण्यात आलं.”

 

First Published on: May 20, 2020 10:42 PM
Exit mobile version