इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला संशयित रूग्ण आढळला नागपूरात!

इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला संशयित रूग्ण आढळला नागपूरात!

प्रातिनिधीक फोटो

जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असून या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडमध्ये नव्या कोरोना व्हायरसचा प्रकार (स्ट्रेन) आढळून आला आहे. ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा प्रकार समोर आल्याने ब्रिटन हादरले असून जगासमोर नवं आव्हान उभं राहिले आहे. हा कोरोना व्हायरसचा दुसरा स्ट्रेन आधीच्या कोरोना व्हायरस आणि पहिल्या कोरोना स्ट्रेनपेक्षा सुपरस्प्रेडर असल्याचे समोर आले आहे. या दुसऱ्या कोरोना स्ट्रेनचा प्रादुर्भाव लवकर पसरतो. दरम्यान, या नव्या व्हायरसवर संशोधन सुरू असताना नागपूरमध्ये इंग्लंडहून आलेल्या तरूणाला या नव्या व्हायरसची लागण झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला नागपूरमधील २८ वर्षीय तरुण कोरोनाबधित आढळला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची अनेकांना लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण कोरोनाच्या नवीन प्रकाराने बाधित असल्याचा संशय आहे. या कोरोना संशयितामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. बाधित तरुणावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा तरुण इंग्लंडमधून आल्यानंतर नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आला होता. या तरुणाच्या संपर्कात आलेले कुटुंबातील सदस्यांसह इतर काही जणही कोरोनाबाधित झाले आहेत.

या इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या २८ वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. तर दक्षिणसह पूर्व इंग्लंडमध्ये धूमाकूळ घालणाऱ्या नव्या कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेला संशयित रूग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

एका आठवड्याच्या आत व्हायरसचा दुसरा स्ट्रेन!

ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट ह‌ॅकाँक यांनी याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या स्ट्रेनपेक्षा हा दुसरा स्ट्रेन धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बुधवारी संध्याकाळी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट ह‌ॅकाँक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दक्षिण आफ्रिकेतून जे दोन प्रवासी लंडनमध्ये परतले होते. त्यांची नियमाप्रमाणे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळेस त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची नवीन स्ट्रेन आढळली.’


कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे हे आहे नाव, कोरोनाची दुसऱ्यांदाही होऊ शकते लागण
First Published on: December 24, 2020 3:32 PM
Exit mobile version