न्यूझीलंडच्या गोळीबारात भारतीय जखमी; ओवेसींचे मदतीचे आवाहन

न्यूझीलंडच्या गोळीबारात भारतीय जखमी; ओवेसींचे मदतीचे आवाहन

न्यूझीलंडच्या गोळीबारात भारतीय जखमी

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये अज्ञाताने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या गोळीबारात आता पर्यंत ४९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये एका भारतीयाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या भारतीयाची ओळख पटली असून अहमद जहांगीर असे त्याचे नाव आहे. अहमद जहांगीर यांची प्रकृती गंभीर असून न्यूझीलंडमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जहांगीरला मदत करण्याचे आवाहन

एमआयएचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी टि्वट करुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाला अहमद जहांगीरचा भाऊ इक्बाल जहांगीरला मदत करण्याचे आवाहन केले आहे. इक्बाल जहांगीर हैदराबादचा रहिवाशी असून भावाच्या कुटुंबाच्या मदतीसाठी इक्बालला न्यूझीलंडला जायचे आहे. तरी सुषमा स्वराज्या आणि तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने इक्बालसाठी आवश्यक ती व्यवस्था करावी असे ओवेसी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. तसेच व्हिसा प्रक्रिया वेगवान गतीने करण्यासाठी सहकार्य करा. तसेच न्यूझीलंडला जाण्यासाठी तो त्याची सर्व व्यवस्था करेल, असे देखील ओवेसी यांनी म्हटले आहे.

नऊ जण बेपत्ता

न्यूझीलंडमध्ये भारतीय वंशाचे नऊ जण बेपत्ता आहेत अशी माहिती न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्त सानजी कोहली यांनी दिली आहे.


वाचा – भारत आक्रमक; न्यूझीलंडच्या दहशतवाद्याचा जाहीरनामा समोर

वाचा – न्यूझीलंडमधील मशिदीत गोळीबार; ४९ जणांचा मृत्यू


 

First Published on: March 16, 2019 1:54 PM
Exit mobile version