निर्भया प्रकरण : आरोपींना २० मार्चला फासावर लटकवणार

निर्भया प्रकरण : आरोपींना २० मार्चला फासावर लटकवणार

फाशी नको, आजीवन कारावास द्या; निर्भयाच्या दोषीची मागणी

दिल्लीत २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींचे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता फाशी दिली जाणार असून पतियाळा कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. मात्र, २ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका फेटाळली होती. त्यानंतर पवनने पुन्हा एकदा राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ४ मार्च रोजी याचिका फेटाळून लावली. मात्र, याचिकेमुळे आरोपींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली होती. मात्र, पुन्हा एकदा नवीन वॉरंट जारी करण्यात आले असून येत्या २० मार्चला या चारही आरोपींना फाशी दिली जाणार आहे.

दोषींचे डेथ वॉरंट जारी

मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या चौघांविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यात आले आहे. यापूर्वी ७ जानेवारीला पहिल्यांदा ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यात आले होते आणि त्यांची अंमलबजावणी १७ जानेवारी आणि नंतर ३१ जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा नवे डेथ वॉरंट काढण्यात आले आहे.


हेही वाचा – पीएफचा व्याजदर पुन्हा घटला; नोकरदार वर्गाला बसणार फटका


 

First Published on: March 5, 2020 2:48 PM
Exit mobile version