घरताज्या घडामोडीपीएफचा व्याजदर पुन्हा घटला; नोकरदार वर्गाला बसणार फटका

पीएफचा व्याजदर पुन्हा घटला; नोकरदार वर्गाला बसणार फटका

Subscribe

केंद्र सरकाने देशातील नोकरवर्गाला मोठा धक्का दिला असून भविष्य निर्वाह निधी (पीएफ)मध्ये कपात करण्यात आली आहे. मोदी सरकारने पीएफचे व्याजदर ०.१५ टक्क्यांनी घटले आहे.

केंद्र सरकाने देशातील नोकरवर्गाला मोठा धक्का दिला असून भविष्य निर्वाह निधी (पीएफ)मध्ये कपात करण्यात आली आहे. मोदी सरकारने पीएफचे व्याजदर ०.१५ टक्क्यांनी घटले आहे. केंद्र सरकारने पीएफवरील व्याजदर पुन्हा घटविण्यात आले असून पीएफवरील व्याजदर ८.६५ टक्क्यांवरुन ८.५० टक्क्यांवर आल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली. यापूर्वी मोदी सरकार ईपीएफमध्ये कपात करेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. गुरूवारी ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. याच बोर्डकडून पीएफच्या व्याजाची टक्केवारी निश्चित केली जाते.

- Advertisement -

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, आता नोकरदारांना २०१९-२० मध्ये जमा झालेल्या त्यांच्या पीएफवर ०.१५ टक्के कमी व्याज मिळणार आहे. २०१८-१९मध्ये हा व्याजदर ८.६५ टक्के होता. आता ८.५० टक्के व्याज मिळेल. ईपीएफओच्या विश्वस्ताच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक पातळीवर फारसी चांगली कामगिरी होत नसल्याने ईपीएफओच्या गुंतवणुकीला फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -