एअर स्ट्राईकचा उल्लेख करणं म्हणजे ‘राज’कारण नव्हे – निर्मला सीतारामण

एअर स्ट्राईकचा उल्लेख करणं म्हणजे ‘राज’कारण नव्हे – निर्मला सीतारामण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाकिस्तानबद्दलची कठोर भूमिका आणि भारतीय लष्कराची कारवाई देशातील सर्वसामान्यांना भावली आहे. ही जनता मोदींच्या पाठिशी उभी असताना बालाकोट येथील एअर स्ट्राईकचा उल्लेख करणे म्हणजे राजकारण नव्हे, असे म्हणत केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. उरी, पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही देशाला बालाकोट येथील एअर स्ट्राईक करुन नेतृत्व सक्षम असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे त्याचा उल्लेख करणे म्हणजे राजकारण करतोय’, असे होत नसल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

देशाच्या सुरक्षितेचे पुरावे मागतात

पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने या हल्ल्याचे चोखप्रत्युत्तर देत जैशच्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने बॉम्ब वर्षाव केला. या बॉम्बवर्षावात जवळपास २५० हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू करण्यात आला. देश सुरक्षेसाठी कठोर पावले उचली असून देखील याबाबत पुरावे मागितले जात आहेत. तर विरोधी पक्ष पाकिस्तानाला आवडेल अशा भाषा बोल्या जात आहेत. त्यामुळे अत्यंत वाईट वाटतं असल्याचे सीतारामण यांनी म्हटले आहे.

साध्वीच वक्तव्य वैयक्तिक होतं

मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य संशयित आणि भाजपच्या उमेदवारी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले. तसेच माजी एटीएएसप्रमुख हेमंत करकरेंना माझा शाप भोवला’, असल्याचे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. मात्र, हे त्यांचे वक्तव्य वैयक्तिक होते. त्यांचा पक्षाचा कोणताही संबंध नाही. तसेच त्यांनी त्यांने हे वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले आहे. त्यामुळे या वक्तव्याने पक्षाला बुमरँग झाले, असे म्हणणे उचित नसल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले आहे.

राफेल प्रकरणामुळे संरक्षण खरेदी प्रक्रिया बदलणार

राफेलची प्रक्रिया नियमानुसार झाली आहे. तसेच यापुढेही खरेदी प्रक्रिया नियमानुसारच होणार आहे. त्यामुळे यापुढेही खरेदी नियम प्रक्रिया बदलण्याचा प्रश्न येत नसल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.


वाचा – करकरेंना माझा शाप भोवला

वाचा – साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीवर अखेर बोलले राज ठाकरे!


 

First Published on: April 25, 2019 6:47 PM
Exit mobile version