Nisarg Cyclone: मुंबईनंतर गुजरातच्या दिशेने जाणार वादळ; किनाऱ्यांवर सुरक्षा रक्षक तैनात

Nisarg Cyclone: मुंबईनंतर गुजरातच्या दिशेने जाणार वादळ; किनाऱ्यांवर सुरक्षा रक्षक तैनात

महाराष्ट्रात दुपारी एकच्या दरम्यान धडकलेले निसर्ग चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने वळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यातील कोकण किनारपट्ट्यांवर सर्वात प्रभावी असे हे निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकले असून पुढे रायगडच्या किनारपट्ट्यावरून मुंबईच्या दिशेने आले. मुंबई, ठाणेनंतर हे वादळ पालघरच्या दिशेने जाऊन गुजरातच्या मार्गे जाणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबई, पालघर करत गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या या वादळाचा फटका बसू नये याकरता तिथे सुरक्षेच्याही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिव, दमण या समुद्र किनाऱ्यांवर एनडीआरएफच्या तुकड्यांना पाचारण केले असून किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

नागरिकांना केले स्थलांतरीत 

गुजरातच्या समुद्र किनाऱ्यांवर हाय टाइट घोषित करण्यात आले असून दुपारपासूनच तेथे समुद्राच्या लाटा उसळताना दिसत आहेत. एनडीआरएफचे जवान किनाऱ्यांवर तैनात असून तेथील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास मदत करत आहेत. कोणतीही जीवीहानी होऊ नये याकरता गुजरात प्रशासनाने सर्व खबरदारीचे उपाय केले आहेत. तसेच वीत्तहानी कमी प्रमाणात व्हावी याचीही काळजी ते घेत आहेत.

महाराष्ट्रासह गुजरातलाही वादळाचा फटका 

निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना होणार आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज काही दिवसांपूर्वी वर्तवण्यात आला होता. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसंच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्ग वादळाचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

हे वाचा – NisargCyclone : अर्षद वारसी म्हणतो, ‘असा मुख्यमंत्री दुसरा कुणी नसेल’!

First Published on: June 3, 2020 4:08 PM
Exit mobile version