पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता, काँग्रेस प्रवेशाच्या प्रस्तावाला गडकरींचे उत्तर

पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता, काँग्रेस प्रवेशाच्या प्रस्तावाला गडकरींचे उत्तर

 नवी दिल्ली – काही काळापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर गडकरींचे भाजपमध्ये खच्चीकरण केले जात असेल, तर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, अशा ऑफर त्यांना देण्यात आल्या. यावर नितीन गडकरींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांना साथ देऊ, असे विधान काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. यानंतर आता नितीन गडकरी यांनी यावर स्पष्ट भाष्य केले आहे.

नितीन गडकरी काय म्हणाले –

काँग्रेसकडून देण्यात आलेल्या ऑफरबाबत स्पष्टीकरण देताना नितीन गडकरी म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. मी माझ्या विचारांसाठी राजकारणात आलो. त्यामुळे माझ्या विचारधारेशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मला कुणी आमंत्रण द्यावे किंवा कुणी काय बोलावे? हा त्यांचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता आहे. त्यामुळे मी माझ्या सिद्धांताप्रमाणे आणि विचाराप्रमाणे आयुष्यभर काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे, असे स्पष्ट विधान नितीन गडकरी यांनी केले. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

गडकरींचे पंख छाटण्याच्या प्रयत्न केल्याच्या चर्चा –

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.

First Published on: September 12, 2022 1:44 PM
Exit mobile version