नितीश कुमारांच्या पक्षाचा भाजपवर निशाणा, एनडीए आघाडीतील तणाव वाढला

नितीश कुमारांच्या पक्षाचा भाजपवर निशाणा, एनडीए आघाडीतील तणाव वाढला

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी जनता दलच्या (युनायटेड) सर्व आमदार आणि खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपाविरोधात मोर्चाबांधणी केली जाण्याची चर्चा सुरु आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अशी अनेक कारणे समोर आली, ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे. सर्वप्रथम केंद्रीय मंत्रिमंडळातील वाटपावरुन जेडीयू आणि भाजपमध्ये वाद झाला होता. जेडीयूने भाजपचा टोकन स्टेक ऑफर नाकारला. यामुळे आता नितीश कुमारांकडून भाजपला डिवचण्याची एकही संधी सोडली जात नाही.

सर्वप्रथम, केंद्रीय मंत्रिमंडळातील वाटपावरुन जेडीयू आणि भाजपमध्ये वाद झाला होता. जेडीयूने भाजपची सांकेतिक भागीदारीची ऑफर नाकारली. यात आरसीपी सिंग अध्यक्ष असताना जेडीयू कोट्यातून केंद्रात मंत्री झाले, पण गेल्या महिन्यात नितीशकुमार यांच्या पक्षाने आरसीपी सिंग यांना राज्यसभेचे तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला. जेडीयूमध्ये सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे शनिवारी आरसीपी सिंह यांनी जेडीयूला राम राम केला, यावेळी त्यांनी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले.

भारतीय प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी आणि जेडीयूचे एकेकाळचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले आरसीपी सिंग यांनी जेडीयू सोडताना सांगितले की, मी केंद्रीय मंत्री झालो असल्याने माझ्याविरुद्ध कट रचला गेला आहे. मी एवढंच म्हणेन की ईर्ष्येवर काही इलाज नाही.

नितीश कुमारांवर हल्ला करताना आरसीपी सिंह म्हणाले की, नितीश कुमार त्यांना पुढील सात जन्मातही पंतप्रधान होता येणार नाही. आरसीपी सिंह यांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर रविवारी नितीश कुमार यांनी आपल्या प्रमुख नेत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मीडियासमोर पाठवले. यावेळी बेकायदेशीर मालमत्तेच्या व्यवहाराचा हवाला देत नेत्यांनी आरसीपी सिंग यांच्यावर हल्ला चढवला.

JDU चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन (लालन) सिंग यांनी आरसीपी सिंगच्या हल्ल्यांना केवळ प्रत्युत्तर दिले नाही. उलट त्यांनी मित्रपक्ष भाजपलाही धमकी दिली. राजीव रंजन पत्रकारांना म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याची काय गरज होती? मुख्यमंत्र्यांनी 2019 मध्ये निर्णय घेतला होता की, आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचा भाग होणार नाही.” नजीकच्या भविष्यातही जेडीयूचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नाही, असे ते म्हणाले.

यात मुख्यमंत्री नितीश कुमार अलीकडेच प्रकृतीच्या कारणास्तव दिल्लीतील सरकारी थिंक टँक NITI आयोगाच्या बैठकीपासून स्वतःला दूर ठेवले होते. ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्यासह 23 मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला होता. मात्र नितीश कुमार यांच्या अनुपस्थितीकडे त्यांच्या भाजपवर असलेला आणखी एक राग म्हणून पाहिले आहे.

केंद्रात मंत्रिपदासाठी मोदी सरकारशी थेट चर्चा केल्याचा आरोप आरसीपी सिंग यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नितीश कुमार यांच्याशी बोलले होते आणि आरसीपी सिंग स्वत: केंद्रीय मंत्री होतील या अटीवर पक्षाला बर्थ ऑफर केला होता.

दुसरीकडे लालन सिंह यांनी मीडियासमोर चिराग मॉडेलबद्दल वक्तव्य केले होते. ज्यावर आता चिराग पासवान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी सकारात्मक राजकारण करतो, मी कोणाचा आदर्श नाही. ज्याने दुसऱ्याचे घर फोडले त्याच्या घरात फूट पडली आहे. चौकाचौकात बाहेरची कारणे न शोधलेले बरे आहे.


Video : सपा नेत्याच्या कारला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; 500 मीटरपर्यंत नेले फरफटत; आरोपीला अटक

First Published on: August 8, 2022 8:58 AM
Exit mobile version