Video : सपा नेत्याच्या कारला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; 500 मीटरपर्यंत नेले फरफटत; आरोपीला अटक

सपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यादव कार्यालयातील काम आटपून आपल्या कारने घरी जात होते, याचवेळी अचानक हा अपघात झाला

VIDEO Uttar Pradesh SP leaders car hit by truck dragged for more than 500 meters in Mainpuri

समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यादव यांच्या कारचा रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्यांच्या कारला  भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रक चालकाने जोरदार धडक दिली, यानंतर ट्रक चालक त्यांच्या कारला जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत घसपटत घेऊन गेला, या अपघाताचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

व्हिडीओतून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की, हा अपघात किती भीषण होता. सुदैवाने या अपघातात देवेंद्र सिंह यादव यांना कोणताही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. हा अपघात घडवून आण्यात आला होता का? किंवा यात कोणाचा हात आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान घटनेवर मणिपूरचे एसपी कमलेश दीक्षित म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या कारला ट्रकने धडक दिली त्यानंतर ती कार 500 मीटरपेक्षा जास्त फरफटत नेली गेली. या प्रकरणी इटावा येथील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

सपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यादव कार्यालयातील काम आटपून आपल्या कारने घरी जात होते. याचवेळी अचानक हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर येणाऱ्या- जाणाऱ्यांना पण काही वेळ काय सुरु आहे समजले नाही. ट्रक चालकाने 500 मीटरपर्यंत त्यांची कार फरपटत नेली. जेव्हा ट्रक चालकाने ब्रेक मारला त्यानंतर रस्त्यावरून चालणाऱ्या अनेक जण त्यांच्या मदतीसाठी धावून आले. तसेच त्यांना कारमधून बाहेर काढत तात्काळ पोलिसांशी संपर्क करत घटनेची माहिती दिली.


हेही वाचा : नंदुरबारमध्ये खासदार हिना गावित यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या