Petrol Diesel Price: २१व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात दिलासा; जाणून घ्या आजची किंमत

Petrol Diesel Price: २१व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात दिलासा; जाणून घ्या आजची किंमत

Petrol Price Today : IOCL कडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील भाव

सरकारी तेल कंपन्यांकडून आज २१व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. २१व्या दिवसानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्यामुळे सर्वसामान्यांना खूप दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन आठवड्यात सर्वसामान्यांना दिलासा देत तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. यापूर्वी अनेक राज्यांमध्ये डिझेलचे दर १०० रुपयेहून अधिक झाले होते. देशात दररोज वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांवर खूप मोठा परिणाम होत होता.

दिल्लीत पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये तर डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रती लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत १०९.९८ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.१४ रुपये प्रति लीटर आहे. तसेच कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १०४.६७ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.७९ रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत १०१.४० रुपये लीटर आणि डिझेलची किंमत ९१.४३ रुपये लीटर झाले.

या राज्यांमध्ये पेट्रोलच्या किंमती १०० रुपये पार

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिसा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या किंमत १०० रुपये पार झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक आहे.

तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे काय आहेत दर?

एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, तुम्ही RSP आणि शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ नंबरवर पाठवा. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो, जो तुम्हाला आयओसीएलच्या वेबसाईटवर मिळू शकतो.


हेही वाचा – केंद्रीय मंत्रिमंडळाची कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी


 

First Published on: November 25, 2021 7:53 AM
Exit mobile version