करोनामुळे रोमान्स झाला ‘फिका’, किसिंग सीनवर बंदी

करोनामुळे रोमान्स झाला ‘फिका’, किसिंग सीनवर बंदी

करोना व्हायरसने चीनबरोबरच जगभरातील इतर देशात एकूण ९१० जणांचा मृत्यू झाला असून ४०, ५५४ जणांना त्याची लागण झाली आहे. यामुळे धास्तावलेल्या तैवानमधील मनोरंजन इंडस्ट्रीने चित्रपट व टिव्ही मालिकांमध्ये यापुढे किसिंग व रोमान्स सीनवरच बंदी घातली आहे. संसर्गातून करोनाची लागण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

तैवानमधील वृत्तसंस्था युनायटेड डेलीने याबद्दल माहिती दिली आहे. त्यात चीनमधील वुहान शहरात मृत्यूचे तांडव घालणाऱ्या करोनामुळे रोमान्स सीनवर बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी जवळीक करू नये असेही यात म्हटले आहे. तसेच यापुढे मालिका व चित्रपटात रोमान्स दिसणार नाही असे तैवान चित्रपट व मालिका निर्मात्यांनी म्हटल्याचे या वृत्तात सांगण्यात आले आहे. तसेच तैवानमध्ये चित्रपट व मालिकांचे शूटींग सुरू राहील असेही या वृत्तात नमूद करण्यात आल्या आहेत.

तैवानमधील फोरमोसा टिव्हीव दाखवण्यात येणारी मालिका गोल्डन सिटीमध्ये बोल्ड सीन आहेत. या सीनसाठीच ही मालिका लोकप्रिय असल्याने यातील अभिनेत्री मिया चिऊ आणि अभिनेता जून फू यांनाही काही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शूटींग दरम्यान मास्क घालणे आवश्यक असल्याने सेटवर बऱ्याचवेळा माणसे ओळखण्यात गोंधळ उडत असल्याचे बघावयास मिळत आहे.

 

First Published on: February 10, 2020 2:43 PM
Exit mobile version