‘या’ देशाच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल जाहीर

‘या’ देशाच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल जाहीर

यंदा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. इरिट्रिया या शत्रू देशासोबत शांतता प्रस्थापित केल्याबद्दल त्यांना शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले अशी माहिती पारितोषिक निवड समितीने दिली आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी यंदा जगभरातून ३०१ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जामध्ये २२३ व्यक्ती आणि ७८ संघटनांचा समावेश होता.

…म्हणून अबी अहमद यांची निवड

२०१८ मध्ये अबी अहमद इथियोपियाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर इथियोपियामध्ये मोठ्या प्रमाणात उदारीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर अहमद यांनी हजारो विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची तुरुंगवासातून सुटका करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे निर्वासित असलेल्या असंतुष्टांना देशात परत येण्याची परवानगी दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत अबी अहमद यांना शांततेचा नोबेल जाहीर करण्यात आला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी यंदा जगभरातून ३०१ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जामध्ये २२३ व्यक्ती आणि ७८ संघटनांचा समावेश होता. पण निवड समितीने अबी अहमद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे अबी अहमद यांना २०१९चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

नोबेल पुरस्काराचे स्वरुप

नोबेल पुरस्कार विजेत्याला साडे चार कोटी रुपये रोख रुपये दिले जातात. त्यासोबत २३ कॅरेट सोन्याचा २०० ग्रॅमचे पदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते. सोन्याच्या पदकावर नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असतो. यासह पदकावर त्यांच्या जन्म आणि मृत्यूची तारीख असते. पदकाच्या दुसऱ्या बाजूला युनानी देवी आयसिसच्या चित्रासह रॉयल अकादमी ऑफ सायन्स स्टॉकहोम पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली असते.

अशी होणार नोबेल पुरस्कारांची घोषणा

सोमवार, ७ ऑक्टोबर – वैद्यशास्त्र
मंगळवार, ८ ऑक्टोबर – भौतिक शास्त्र
बुधवार, ९ ऑक्टोबर – रसायनशास्त्र
गुरुवार, १० ऑक्टोबर – साहित्य
शुक्रवार, ११ ऑक्टोबर – शांतता
सोमवार, १४ ऑक्टोबर – अर्थशास्त्र

First Published on: October 11, 2019 5:22 PM
Exit mobile version