जॅकलिन विरोधात नोरा फतेहकडून २०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

जॅकलिन विरोधात नोरा फतेहकडून २०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

नवी दिल्ली : अभिनेत्री नोरा फतेहने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरोधात २०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखरला २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रींग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने आपल्याविरोधात खोटी साक्ष दिल्याचा आरोप करत नोरा फतेहने जॅकलिन फर्नांडिसविरोधात दावा दाखल केला आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पटियाला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरोपी सुकेशने अभिनेत्री जॅकलिनला महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचा सक्तवसुली संचलनालयाचा(ईडी) आरोप आहे. पटियाला हाऊस कोर्टाने गेल्या मंगळवारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २ लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक आणि तेवढ्याच रक्कमेच जामीन देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.

१० नोव्हेंबर रोजी  जॅकलिनच्या जामिनावर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला होता. जॅकलिनच्या जामीनाला ईडीने विरोध करत तिला जामीन देऊ नये, अशी मागणी न्यायालयात केली होती. त्याचवेळी जॅकलिनने ईडीवर छळ केल्याचा आरोप केला होता.

चौकशीत अभिनेत्री जॅकलिनने आपल्याविरोधात साक्ष दिली आहे. हे चुकीचे आहे. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना यामध्ये आपल्याला गोवण्यात येत असल्याचा दावा नोराने केला आहे. या दाव्यावर लवकरच सुनावणी होणे अपेक्षित आहे.

दरम्यान  फिफा वर्ल्डकपमध्ये भारताकडून सादरीकरण करणाऱ्या नोरा फतेहीने तिच्या जबरदस्त नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या लूकपासून ते तिच्या ड्रेसपर्यंत सर्व गोष्टी चर्चेत आहेत. याच दरम्यान नोराने केलेल्या एका कृत्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले.  स्टेजवर परफॉर्म करता करता नोराने भारताचा तिरंगा हातात घेवून तो उलटा पकडून फडकवला. नोराच्या या कृत्याने तिने तिरंग्याचा अपमान केला. इतकंच नव्हे तर ज्याप्रकारे ती तिरंगा फडकावत होती. ती पद्धत देखील चुकीची होती. ज्यामुळे नोराला अनेकजणांनी ट्रोल केले. नोराने तिरंगा पकडलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाले.

First Published on: December 12, 2022 11:07 PM
Exit mobile version