Corona: प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह

Corona: प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह

नोवाक जोकोविच

प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नोवाक जोकोविचची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जोकोविचच्या मुलांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. काही दिवसांपूर्वी नोवाक जोकोविच एड्रिया टूरमध्ये सहभागी झाला होता. या टूरमध्ये सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली असून सोमवारी पाकिस्तान संघातील हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आले होती. तर आता त्यांच्यातील आणखी सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे खेळाडूंमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे यातून निदर्शनास येत आहे.

हेही वाचा –

जाणून घ्या, कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांना आयुष्यभर होऊ शकतो ‘हा’ त्रास

First Published on: June 23, 2020 8:42 PM
Exit mobile version