घरदेश-विदेशजाणून घ्या, कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांना आयुष्यभर होऊ शकतो 'हा' त्रास

जाणून घ्या, कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांना आयुष्यभर होऊ शकतो ‘हा’ त्रास

Subscribe

कोरोनामधून बरे झालेल्या प्रत्येक तीन रुग्णांपैकी एकास आयुष्यभर आरोग्य समस्या उद्भवू शकतात तसेच फुफ्फुसांनाही अधिक नुकसान पोहोचू शकते

एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, कोरोनामधून बरे झालेल्या प्रत्येक तीन रुग्णांपैकी एकास आयुष्यभर आरोग्य समस्या उद्भवू शकतात तसेच फुफ्फुसांनाही अधिक नुकसान पोहोचू शकते. इंग्लंडची अग्रगण्य आरोग्य संस्था नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती देत ब्रिटीश टेलीग्राफ वृत्तपत्राने या गोष्टी प्रकाशित केल्या आहेत.

ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मार्गदर्शनानुसार, कोरोनामधून बरे झालेल्या ३० टक्के रुग्णांना फुफ्फुसांचे आजार होऊ शकतो. त्यांच्यात मानसिक थकवा आणि मानसिक अस्वस्थता देखील निर्माण होऊ शकते. त्याच वेळी, आयसीयूमध्ये उपचारानंतर बरे झालेल्या अर्ध्या रूग्णांना बराच कालावधीसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

- Advertisement -

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे शरीरात कायमस्वरुपी समस्या उद्भवू शकतात, असे सतत पुरावे आढळून येत आहेत. यासह जे लोक कोरोनामुळे आजारी पडल्यानंतर ते बरे झाल्यानंतरही त्यांच्या मेंदूला नुकसान पोहोचू शकते आणि अल्झायमरचा धोका निर्माण होऊ शकतो. एनएचएसच्या कोविड रिकव्हरी सेंटरच्या प्रमुख हिलरी फ्लॉयड यांनी सांगितले की, कोरोनाच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल फारशी माहिती नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र बरेच रुग्ण कोरोना निगेटिव्ह असूनही त्यांना उपचारांची आवश्यकता असल्याचे ही त्यांनी सांगितले.

हिलरी यांनी असे सांगितले की, आता बरे झालेल्या त्यांच्या ४० ते ५० वर्षांच्या रूग्णांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला आहे. ते म्हणाले की , हे लोक पूर्वी जिम, पोहणे, व्यवसाय इत्यादी सर्व गोष्टी स्वत: हून करत होते पण आता कोरोना निगेटिव्ह झाल्यावरसुद्धा त्यांना अंथरुणावरुन उठता येत नाही.


हुश्श्य, केसांचं जंजाळ कमी होणार; सलून उघडण्यास लवकरच परवानगी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -