CoronaVirus: अवघ्या ४५ मिनिटांत कोरोना चाचणीचा रिपोर्ट समजणार!

CoronaVirus: अवघ्या ४५ मिनिटांत कोरोना चाचणीचा रिपोर्ट समजणार!

Photo Credit: AP

जगभरासह देशही कोरोना व्हायरसने हैरान झाला असून त्यापुढे हतबल झाला आहे. कोरोनाचा आकडा जगभरात वाढत असताना कोरोनावर योग्य उपचार करण्यासाठी जगभरातून नव-नवीन पद्धतीचा अभ्यास, संशोधनाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याच्या रिपोर्ट समजण्यासाठी बऱ्याच वेळ वाट पहावी लागत होती. मात्र अशा परिस्थितीत काही संशोधकांनी कोरोना व्हायरसची तपासणी झटपट करण्यासाठी एक नवं स्वॅब टेस्ट किट शोधलं आहे.

अस आहे हे नवं किट

या स्वॅब टेस्ट किटमार्फत अवघ्या ४५ मिनिटांमध्ये कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसची लागण झाली आहे की, नाही. हे समजणं सोपं होणार आहे. त्यामुळे कोरोना संशयितांची चाचणी लवकरात लवकर करण्यास मदत होणार आहे.

ही नवीन स्वॅब टेस्टला ‘SARS-CoV-2’ हे नाव देण्यात आलं असून याद्वारे टेस्ट करणं सहज शक्य होणार आहे. तसेच यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज भासणार नाही. कोरोना व्हायरसची ही चाचणी सध्या उपलब्ध असलेल्या चाचणी प्रमाणेच काम करते, असे अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिवर्सिटीच्या संशोधकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप या नव्या टेस्टला अमेरिकी फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,  क्रिस्पर टेक्नॉलॉजीने शोधलेल्या या नव्या टेस्टमुळे कोरोनाची लागण आहे की नाही, ही तपासणी कमी वेळात करण्यास मदत होणार आहे. ‘SARS-CoV-2’ हे पहिले किट असून ज्यामध्ये कोविड-19 ची तपासणी करण्यासाठी क्रिस्पर जीन – टार्गेटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.


ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाची चाचणी सुरू; ८० टक्के यशस्वी होणार!
First Published on: April 30, 2020 3:46 PM
Exit mobile version