घरदेश-विदेशब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाची चाचणी सुरू; ८० टक्के यशस्वी होणार!

ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाची चाचणी सुरू; ८० टक्के यशस्वी होणार!

Subscribe

ब्रिटनमधील १६५ रूग्णालयातील साधारण ५ हजार रूग्णांवर महिनाभर या लसीकरणाची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच युरोप आणि अमेरिकेतील शेकडो लोकांवर देखील याचे परिक्षण होणार

जगभरात, कोरोना व्हायरसचा कहर वाढत असल्याने संपूर्ण जगातच कोरोनाची लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून या लसीकरण चाचण्यांना वेग आला आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कोरोनाव्हायरस लसीकरणाची सर्वात मोठी चाचणी गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष या चाचणीकडे लागले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही कोरोना चाचणी ८० टक्के यशस्वी होण्याची शक्यता आहे. ही लस तयार करण्यासाठी ChAdOx हे तंत्र वापरले गेले आहे.

ब्रिटनमधील १६५ रूग्णालयातील साधारण ५ हजार रूग्णांवर महिनाभर या लसीकरणाची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच युरोप आणि अमेरिकेतील शेकडो लोकांवर देखील याचे परिक्षण केले जाणार आहे. “ही जगातील सर्वात मोठी कोरोना व्हायरस चाचणी आहे.,” असे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोग विभागातील प्राध्यापक पीटर हॉर्बी यांनी सांगितले. यासह प्राध्यापक हॉर्बी यांनी यापूर्वी इबोलाच्या चाचणीचे नेतृत्वही केले.

- Advertisement -

दोन लसीकरण चाचण्या आघाडीवर

दरम्यान, दोन कोरोना लसीकरण चाचण्या सध्या आघाडीवर असल्याचे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की एक ऑक्सफर्ड येथे तयार केला जात असून दुसरी चाचणी इम्पीरियल कॉलेजमध्ये तयार होत आहे. हॅनकॉक यांच्या मते, विद्यापीठाला या लसीकरण प्रकल्पासाठी यूके सरकारकडून सुमारे २० दशलक्ष डॉलर्स इतका निधी देण्यात आला आहे. तर इम्पीरियल कॉलेजला यूके सरकारने दुसर्‍या लसीकरण प्रकल्पासाठी २.२० दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला आहे.

लस ८० टक्के यशस्वी होण्याची शक्यता

ही लसीकरण चाचणी ऑक्सफर्ड विद्यापीठ जेनर इन्स्टिट्यूटतर्फे सुरू आहे. संशोधन संचालक प्रोफेसर सारा गिलबर्ट यांच्यामते, ही लस ८० टक्के यशस्वी होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपर्यंत या लसीचे दशलक्ष डोस तयार करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. जेणेकरुन ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहचवले जाऊ शकेल. एकदा लसीकरणाची संभाव्यता लक्षात आली की नंतर ती निर्माण करण्याचे काम सुरू करता येईल, दरम्यान कोरोनापासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण जगाला कोट्यावधी डोसची आवश्यकता आहे. लसीकरण यशस्वी झाल्यास लवकर ही लॉकडाऊन आणि महामारी संपण्यास मदत होईल.


लॉकडाऊनमुळे भारतात २० वर्षांचं प्रदूषण झालं स्वच्छ!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -