आता रुग्णवाहिकेतून तबला, शंख, हार्मोनियमचा सायरन ऐकू येणार!

आता रुग्णवाहिकेतून तबला, शंख, हार्मोनियमचा सायरन ऐकू येणार!

आता रुग्णवाहिकेतून तबला, शंख, हार्मोनियमचा सायरन ऐकू येणार!

रस्त्यावर सायरनचा आवाज ऐकताच प्रत्येकाला समजते की, हा रुग्णवाहिकेचा आवाज आहे. हा आवाज इतर वाहनांच्या आवाजपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. परंतु आता रुग्णवाहिकेतून हा सायरनचा आवाज ऐकू येणे बंद होणार आहे. याच्या जागी आपल्याला दुसरा आवाज ऐकू येणार आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आता रस्त्यावरील धावत्या रुग्णवाहिकेत तबला, हार्मोनियम आणि शंखाचा आवाज बसवण्यात येईल. यावर काम करणे सुरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री म्हणाले की, येणाऱ्या दिवसांत राष्ट्रीय हायवे आणि एक्स्प्रेसवेवर टोल नीतिमध्ये बदल केले जाईल. शिवाय पुढील २ वर्षात जीपीएस सिस्टमद्वारे टोल भरण्याची व्यवस्था सुरू केली जाईल.

अलीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ९० हजार कोटी रुपयांनी होत असलेल्या दिल्ली-मुंबई ग्रीनफील्ड एक्स्प्रेस-वेचे निरीक्षण करण्यासाठी पोहोचले होते. ते म्हणाले की, हा प्रकल्प भारत माल प्रकल्पाच्या अंतर्गत आहे. दोन मोठ्या शहरांना जोडला गेला असून हायवे १३५० किमी लांब असेल. जानेवारी २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. हा हायवे दिल्ली, हरयाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाईल.

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी वाहनांच्या हॉर्नचा कर्कश आवाज बदलून त्याऐवजी भारतीय संगीत क्षेत्रातील वाद्यांचा आवाज वापरण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले होते. मंत्रालयाकडून लवकरच या बाबत अध्यादेश काढण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मधील एका कार्यक्रमात दिली होती. त्यानुसार आता रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज संगीतमय करण्यात येणार आहे.


हेही वाचा – पत्नीला न सांगता सासऱ्याच्या घरावर चढवला जेसीबी, नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा


 

First Published on: September 17, 2021 12:36 PM
Exit mobile version