घरताज्या घडामोडीपत्नीला न सांगता सासऱ्याच्या घरावर चढवला जेसीबी, नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

पत्नीला न सांगता सासऱ्याच्या घरावर चढवला जेसीबी, नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

Subscribe

दिल्ली ते मुंबई ग्रीन एक्सप्रेस वे १३८० किलोमीटरचा असून अवघ्या १२ तासात मुंबई ते दिल्ली अंतर पुर्ण करता येणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजधानी दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या एक्सप्रेस वेच्या कामाची पाहणी केली. यावेळी नितीन गडकरींनी सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चढवला असल्याचा किस्सा सांगितला आहे. हरियाणा राज्यातील रस्त्याची पाहणी करताना मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी एक किस्सा सांगून आपल्या कार्यशैलीबाबतची माहिती दिली आहे. पत्नीला न सांगता सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चढवला आणि रस्त्याचे काम पुर्ण केलं होते असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचे काम २०२३ पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक किस्सा सांगताना म्हटलं आहे की, माझं नवीन नवीन लग्न झालं होते. त्यावेळी सासऱ्यांचे घर रस्त्याच्या मध्ये येत होते. यामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीचा सामना करणं मुश्किल होते. यामुळे पत्नीला न सांगता सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चढवला आणि रस्त्याचे काम पुर्ण केलं असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मात्र नंतर घरी काय झाले याबाबत मी सांगू शकत नाही असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

२०२३ एक्सप्रेस वे पुर्ण होणार

दिल्ली ते मुंबई जोडणारा ग्रीन एक्सप्रेसवेच्या कामाची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी कोरोना काळात महामार्गाचे काम थांबलं होते परंतु आता या रस्त्याचे काम पुन्हा सुरळित झाले आहे. १ लाख कोटी रुपये खर्च करुन हा महामार्ग तयार करण्यात येत आहे. हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा राज्यांना हा एक्सप्रेस वे जोडणार आहे. दिल्ली ते मुंबई ग्रीन एक्सप्रेस वे १३८० किलोमीटरचा असून अवघ्या १२ तासात मुंबई ते दिल्ली अंतर पुर्ण करता येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : केंद्राने केंद्राच्या प्रमाणे काम करावं राज्यांच्या अधिकारांवर…, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -