आता एकाच उमेदवाराला दोन नव्हे, तर एकाच जागेवर लढवता येणार निवडणूक?, केंद्र सरकारकडे प्रस्ताव

आता एकाच उमेदवाराला दोन नव्हे, तर एकाच जागेवर लढवता येणार निवडणूक?, केंद्र सरकारकडे प्रस्ताव

एकावेळी दोन-दोन जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोग मोठा धक्का देण्याच्या तयारी असून येत्या काळात एक उमेदवार एकच जागा लढवू शकतो. त्या उमेदवाराला दुसऱ्या जागी निवडणूक लढवू देण्यास मुभा देऊ नये. एक्सिझ पोल्ससह जनमत चाचण्यांवर बंदी आणवी, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्या संबंधी मागमी करणारा प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. निवडणूक आयोगाने पाठलेला हा प्रस्ताव जर मान्य झाला, तर 1951च्या कलम 37(1) मध्ये मोठा बदल होणार आहे.

अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवत असल्याचे अनेकदा पाहण्यात आले आहे. याला मुख्य निवडणूक आयोगाने विरोध केल्याचे प्रस्तावातून दिसत आहे. तसेच एक्झिट पोल्सची चर्चा निवडणूक निकालाची आधी तुफान असायची. या एक्झिट पोल्सवरही बंद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक आयोगाने केल्या या मागण्या –

First Published on: June 14, 2022 9:09 AM
Exit mobile version