आता ‘या’ कंपनीकडून कर्मचारी कपातीची घोषणा; 4,000 ते 6,000 जणांच्या नोकऱ्या धोक्यात

आता ‘या’ कंपनीकडून कर्मचारी कपातीची घोषणा; 4,000 ते 6,000 जणांच्या नोकऱ्या धोक्यात

देशाभरात आणि जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यात येणार आहे त्या सोबतच नव्याने होणारी नोकरभरती थांबविण्यात आली आहे. HP Inc ने मंगळवारी सांगितले की कंपनी येत्या 3 वर्षात 4000 ते 6000 कर्मचाऱ्यांना ऑफिस मधून कमी करण्यात येणार आहे.

सुमारे 10 टक्के कर्मचारी कपात केले जातील
HP Inc. मधील ही कर्मचाऱ्यांची छाटणी त्यांच्या सध्याच्या कर्मचार्‍यांच्या सुमारे 10 टक्के असल्याचे म्हटले जाते. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनीकडून हे पाऊल उचलण्यात येत आहे. याच संदर्भात मंगळवारी कंपनीने सांगितले आहे की चौथ्या तिमाहीतील महसुलात 11.2 टक्क्यांनी घट झाली आहे, जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत $14.8 अब्ज नोंदवली गेली होती.

एचपी विक्रीत होणारी घट
विक्री होत्र नसल्याने कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्सनल कॉम्प्युटर कंपन्यांना मागील काही महिन्यांत मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कंपनीने असेही सांगितले आहे की चौथ्या तिमाहीत त्यांच्या संगणक विभागाच्या विक्रीत 13 टक्क्यांची घट झाली आहे आणि ती 10.3 अब्ज डॉलरवर आली आहे. यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहक महसुलात वर्षभरात 25 टक्क्यांची घट झाली आहे.

कंपनीच्या सीईओचे विधान
एचपी इंक.चे सीईओ एनरिक लोरेस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अस्थिर मॅक्रो परिस्थितीमुळे आणि मागणी कमी झाल्यामुळे मागील सहा महिन्यांत कंपनीच्या उत्पादनांची विक्री कमी झाली आहे.

अनेक मोठ्या कंपन्यांमध्येही टाळेबंदी
HP Inc ची टाळेबंदी असे सूचित करते की जगातील अनेक देशांमध्ये मंदीचे सावट आहे. वाढते व्याजदर आणि वाढत्या महागाईच्या जमान्यात Amazon, Meta, Twitter सारख्या अनेक बड्या कंपन्यांनी टाळेबंदीचे संकेत कर्मचाऱ्यांना दिले आहेत.


हे ही वाचा – नायजेरियात बसच्या भीषण धडकेत 37 ठार, चार दिवसांतील तिसरा मोठा अपघात

First Published on: November 23, 2022 5:38 PM
Exit mobile version