आता GPS शिवाय शोधा तुमचं ‘लोकेशन’

आता GPS शिवाय शोधा तुमचं ‘लोकेशन’

आता GPS शिवाय ट्रेस करा लोकेशन (प्रातिनिधिक फोटो)

प्रवासादरम्यान एखादं अनोळखं ठिकाण शोधताना आपण सहसा GPS प्रणालीचा वापर करतो. बहुतांशीवेळा जीपीएसच्या साहाय्याने आपण अनोळखी जागा किंवा अनोळखी रस्ते अगदी सहज ट्रॅक करु शकतो. मात्र, आता जीपीएस नसतानाही तुम्ही एखादं लोकेशन ट्रेस करु शकणार आहात. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी एक खास अल्गोरिदम टेक्निक विकसीत केला आहे. या प्रणालीच्या साहाय्याने जिथे जीपीएस मिळणार नाही अशा ठिकाणी तुम्ही एखाद्या माणसाला किंवा रोबोटला शोधू शकणार आहात. येत्या काही काळात या प्रणालीच्या साहाय्याने एखादी जागा/ठिकाणही शोधता येणार असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. ‘एआरएल’च्या (अमेरिकन सैन्य शोध प्रयोगशाळेच्या) शास्त्रज्ञांनी ही प्रणाली विकसीत केली असून, यामध्ये एका भारतीय शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार ही प्रणाली विशेषत: सैन्यातील जवानांसाठी विकसीत करण्यात आली आहे.


वाचा: मोबाईलवरुन Google वापरणं, आता अधिक सोपं

‘एआरएल’च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जीपीएस प्रणाली ही आजच्या घडीला लोकांची गरज बनली आहे. जीपीएसच्या साहाय्याने तुम्ही कुठल्याही अनोळखी ठिकाणी पोहचू शकता. मात्र, सैन्यातील जवानांना जीपीएसच्या वापरामध्ये अडथळे येतात. त्यामुळे त्यांना एखाद्या दुर्गम भागातील माणसाला वा रोबोटला शोधण्यासाठी या नव्या प्रणालीचा फायदा होऊ शकेल. याशिवाय सर्वसामान्य लोकांनाही बऱ्याचदा काही ठिकाणी जीपीएसचे नेटवर्क मिळत नाही. अशावेळी या प्रणालीच्या साहाय्याने ते कुठलीही जागा सहज शोधू शकतील.’


वाचा: ‘गुगल प्लस’ कायमचं बंद, युजर्सच्या डेटाचं काय?

First Published on: October 12, 2018 1:36 PM
Exit mobile version