घरटेक-वेकमोबाईलवरुन Google वापरणं, आता अधिक सोपं

मोबाईलवरुन Google वापरणं, आता अधिक सोपं

Subscribe

या बदलांमुळे Google सर्च करणाऱ्याला एखादी गोष्ट अधिक सोप्या आणि आकर्षक पद्धतीने सर्च करता येईल, असा कंपनीचा दावा आहे.

‘जे कुणालाच ठाऊक नाही, ते Google ला ठाऊक असणार’, असं म्हटलं जातं. थोडक्यात गुगलला जगातील सर्वात अग्रगण्य आणि विश्वासार्ह सर्च इंजिन असा दर्जा मिळाला आहे. याच गुगलने आपल्या फिचर्समध्ये काही नवीन आणि महत्वाचे बदल केले आहेत. नुकतीच कंपनीकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गुगलचे उपाध्यक्ष बेन गोम्स यांनी एका कार्यक्रमामध्ये या बदलांविषयी माहिती दिली. मोबाईल फोनमधून गुगल सर्च करणे अधिक सोपे व्हावे यासाठी गुगलने हे नवे बदल केल्याचं गोम्स यांनी सांगितलं. यातील एक महत्वाचा बदल म्हणजे सर्च विंडोमध्ये गुगल आता जास्तीत जास्त ‘इमेजेस’चा (Images) वापर करणार आहे. ज्यामुळे सर्च करणाऱ्याला एखादी गोष्ट अधिक सोप्या आणि आकर्षक पद्धतीने सर्च करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. दरम्यान याशिवाय अन्य काही तांत्रिक बदलही गुगलकडून करण्यात आले आहेत.


वाचा : Instagram चं नवं ‘लाईट’ व्हर्जन, वैशिष्ट्यं काय?

बेन गोम्स यांच्या सांगण्यानुसार, मशिन लर्निंग हा गुगलच्या कार्यप्रणालीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. येत्या काळात गुगलच्या सर्च इंजिनचे मुख्य लक्ष मोबाईलवर केंद्रित केले जाणार आहे. युजर्सना आता लवकरच फेसबुकप्रमाणेच फोटो तसंच व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेळ्या विषयांवरची सखोल माहितीचा आनंद घेता येणार आहे. गुगलचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्यांसाठी याचा नक्कीच फायदा होईल असंही कंपनीकडून सांगण्यात येत आहे.


वाचा : गुगलसाठी  ‘डुडल’ बनवा, ५ लाख जिंका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -