Corona Vaccine सर्टिफिकेटमध्ये नाव, बर्थ डेटमध्ये झालीयं चुक, CoWin पोर्टलवरुन ‘असे’ करा बदल

Corona Vaccine सर्टिफिकेटमध्ये नाव, बर्थ डेटमध्ये झालीयं चुक, CoWin पोर्टलवरुन ‘असे’ करा बदल

कोरोना विषाणुविरोधात देशभरात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. परंतु लस घेण्याआधी नागरिकांना कोविन (CoWin)अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. परंतु रजिस्ट्रेशन ते लस घेतल्यानंतर ही नागरिकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. रजिस्ट्रेशन करताना अनेकदा नागरिकांकडून जन्म तारीख, किंवा नावात चुका होत आहेत. यामुळे लस घेतल्यानंतर मिळणाऱ्या सर्टिफेकेटमध्येही चुकीची डिटेल्स छापली जात आहे. परंतु ही चुक कशी दुरुस्त करावी असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. लसीकरणाच्या सर्टिफिकेटवरील नाव किंवा एखादी चुकीची माहिती कोविन पोर्टवरून (cowin.gov.in) दुरुस्त करता येते. परंतु कशी करु शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊ…

नाव, बर्थ डेट आणि जेंडरमधील चुक करा दुरुस्त

कोरोनाविरोधी लस घेण्यासाठी cowin पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना चुकून आपले नाव, बर्थ डेट लिहिण्यामध्ये चूक होते. यामुळे वॅक्सिन सर्टिफिकेटमध्येही (Vaccine Certificate) तीच चूक छापून येते. परंतु ही चुकीची माहिती तुम्ही कोविन पोर्टलवरून (cowin.gov.in) दुरुस्त करू शकता. ज्यात तुम्ही तुमचे नाव, बर्थ डेट किंवा लिंग यातील चुक बदलू शकता आणि पु्न्हा नवीन वॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड करु शकता. सध्या या संपूर्ण माहितीला फक्त एकदाच अपडेट करण्याची परवानगी आहे.

चुक दुरुस्त करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप

१) सर्वप्रथम कोविन पोर्टल (cowin.gov.in) वर जाऊन मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा.

२) लॉन इन झाल्यानंतर अकाउंट डिटेलच्या खालील Raise an Issue वर क्लिक करा.

३) मेंबर नेम सिलेक्ट करून Correction in Certificate सिलेक्ट करा.

४) यानंतर नाव, बर्थ डेट, आणि जेंडरचे ऑप्शन दाखविले जाईल. त्यात तुम्ही तुमची चुक दुरुस्त करु शकता.

सोशल मीडियावर शेअर करु नका वॅक्सिन सर्टिफिकेट

केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या सायबर दोस्त या संस्थेने ट्विट करत नागरिकांनी वॅक्सिन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करुन नका असे आवाहन केले आहे. सायबर दोस्तने ट्विट करत लिहिले की, कोरोना वॅक्सिन सर्टिफिकेटवर नाव, बर्थ डेट, वय, लिंग आणि लस घेतलेल्या दिवसाची तारीखसह अनेक महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश असतो. त्यामुळे ही माहिती सोशल मीडियावर शेअर करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. कारण सायबर ठग या माहितीचा उपयोग ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी करु शकतात, त्यामुळे नागरिकांनी आपले वॅक्सिन सर्टिफिकेटवर कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करु नका.


India Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या आत


 

First Published on: June 9, 2021 10:45 AM
Exit mobile version