घरCORONA UPDATEIndia Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या आत

India Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या आत

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान कमी होताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल, मंगळवारी मोठी घट झाली. ६३ दिवसांनी पहिल्यांदा नव्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. काल ८६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते. आज नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असली तरी संख्या एक लाखाच्या आत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ९२ हजार ५९६ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार २१९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख ६२ हजार ६६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

२३ कोटी ९० लाखांहून अधिक जणांचे झाले लसीकरण

देशातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ९० लाख ८९ हजार ६९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ५३ हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ७५ लाख ४ हजार १२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १२ लाख ३१ हजार ४१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात २३ कोटी ९० लाख ५८ हजार ३६० जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

देशात ८ जूनपर्यंत ३७ कोटी १ लाख ९३ हजार ५६३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १९ लाख ८५ हजार ९६७ नमुन्यांच्या चाचण्या कालपर्यंत झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात १७ कोटी ४७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ६२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ कोटी ८१ लाखांहून अधिक जण बरे होऊन घरी गेले आहेत.


हेही वाचा – Corona Vaccination: आता १२ वर्षाखालील वयोगटाच्या मुलांनाही कोरोनाची लस; Pfizerने सुरू केली चाचणी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -