Coronavirus: जर्मनीत कोरोनाचा कहर; कोरोनाग्रस्तांचा आकडा ५८,२४७ वर

Coronavirus: जर्मनीत कोरोनाचा कहर; कोरोनाग्रस्तांचा आकडा ५८,२४७ वर

युरोप खंडात सध्या कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. स्पेन, इटली नंतर आता जर्मनीमध्ये कोरोना विषाणूने हातपाय पसरले आहेत. जर्मनीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणीक वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे तब्बल ६ हजार ८२४ नवे रुग्ण आढळले आहेत. जर्मनीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ५८,२४७ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ४५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या जास्त असली तरी देखील मृतांची संख्या कमी आहे.

जगभरात कोरोनाचे ६ लाखाहून अधिक रुग्ण

जगभरात कोरोना विषाणुने हातपाय पसरले आहेत. जगभरात कोरोनाचे तब्बल ६ लाख ६८ हजार ३६८ कोरोनाचे रुग्ण आहेत. आतापर्यंत ३१ हजार ४५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १ लाख ४३ हजार १०७ रुग्ण बरे झाले आहेत. जगात सर्वात जास्त रुग्ण अमेरिकेत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत.


हेही वाचा – Coronavirus: स्पॅनिश राजकुमारी मारिया टेरेसांचं निधन


 

First Published on: March 29, 2020 3:39 PM
Exit mobile version