घरCORONA UPDATECoronavirus: स्पॅनिश राजकुमारी मारिया टेरेसांचं निधन

Coronavirus: स्पॅनिश राजकुमारी मारिया टेरेसांचं निधन

Subscribe

प्रिन्स सिक्स्टो एनरिक डे बॉर्बन यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचे निधन झाले आहे. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांचा भाऊ प्रिन्स सिक्स्टो एनरिक डे बॉर्बन यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. २६ मार्च रोजी राजकुमारी मारिया टेरेसांचं निधन झाले. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. संपूर्ण जगातील कोणत्याही रॉयल कुटुंबातील हा पहिला मृत्यू आहे. कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. स्पेनमध्ये सध्या कोरोनाने कहर केला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ७३ हजार २३५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर आता पर्यंत ५ हजार ९८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

राजकुमारीने पॅरिसमध्ये अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी माद्रिद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकुमारीचा जन्म पॅरिसमध्ये १९३३ मध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण फ्रान्समध्ये झाले होते. एका अहवालानुसार, ती पॅरिसमधील सोर्बोन आणि माद्रिदमधील कॉम्प्लुटेन्स युनिव्हर्सिटीत प्राध्यापक होती. विदेशी मीडियाच्या वृत्तानुसार, राजकुमारी मारिया टेरेसाला रेड प्रिन्सेस म्हणूनही ओळखल्या जात होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाग्रस्तांनी लावली लग्नाला हजेरी; ५०० जणांना केलं होम क्वारंटाईन


स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे मोठी वाताहत झाली आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. आतापर्यंत ५ हजार ९८२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ८४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ हजार ५१६ नविन रुग्ण आढळले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -