Smokingला विरोध, गरोदर महिलेचा घेतला जीव

Smokingला विरोध, गरोदर महिलेचा घेतला जीव

प्रातिनिधिक फोटो

धावत्या ट्रेनमध्ये सिगरेट ओढण्यास विरोध करणं गरदोर महिलेच्या जीवावर बेतलं आहे. ट्रेनच्या डब्ब्यामध्ये सिगरेट ओढण्यास विरोध केल्यानं प्रवाशानं गरोदर महिलेवर हल्ला केला. त्यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. चिंतन देवी असं या ४५ वर्षीय महिलेचं नाव आहे. शुक्रवारी रात्री चिंतन देवी आपल्या कुटुंबासोबत पंजाब – बिहार जालियनवाला या ट्रेनच्या जनरल डब्ब्यातून प्रवास करत होत्या. यावेळी सोनू यादवनं सिगरेट शिगवली. त्यानंतर चिंतन देवी यांनी सोनू यादवला डब्ब्यामध्ये सिगरेट ओढण्यास विरोध केला. त्याचा राग आल्यानं सोनून चिंतन देवींवर हल्ला केला. त्यामुळे शाहजहाँपूर येथे ट्रेन थांबवून महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, उपचारादरम्यान चिंतन देवी यांचा मृत्यू झाल्याची माहिती जीआरपीं दिली आहे. यानंतर हल्लेखोर सोनू यादवला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चिंतन देवी आपल्या कुटुंबासह छटपुजेसाठी बिहारला चालल्या होत्या.

First Published on: November 10, 2018 4:54 PM
Exit mobile version