Odisha Train Accident : भीषण अपघात रोखता आला असता? अधिकाऱ्यांचे तीन महिन्यांपूर्वीचे पत्र व्हायरल

Odisha Train Accident : भीषण अपघात रोखता आला असता? अधिकाऱ्यांचे तीन महिन्यांपूर्वीचे पत्र व्हायरल

नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघाताची इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघतात नोंद झाली आहे. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीबीआयने ओडिशा रेल्वे अपघाताचा तपास सुरू केला असून सोमवारी संध्याकाळी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या अपघातासंदर्भात एका रेल्वे अधिकाऱ्याचं पत्र व्हायरल होत आहे. त्याने तीन महिन्यांपूर्वीच सिग्नल सिस्टिमधील त्रुटीमुळे अपघात होऊ शकतात, अशी  शक्यता व्यक्त केली होती.

हरिशंकर वर्मा या अधिकाऱ्याने रेल्वे बोर्डाला तीन महिन्यांपूर्वी पत्र लिहिले होते. हा अधिकारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ याठिकाणी तैनात असून तीन वर्षांपासून दक्षिण पश्चिम रेल्वेत कार्यरत आहेत. प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत असताना दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये चुकीच्या मार्गावर ट्रेन गेल्याची प्रकरणं समोर आली होती. (Could the terrible Odisha Train accident have been prevented? The official’s letter three months ago went viral)

गाडी सुरू झाल्यानंतर रूट बदलतो
इंटरलॉकिंगसाठी असलेल्या सिस्टिमला बायपास करून लोकेशन बॉक्सशी छेडछाड होत असल्यामुळे चुकीच्या मार्गावर अनेक वेळा ट्रेन गेली होती. त्यामुळे हरिशंकर वर्मा यांनी ही छेडछाड थांबवण्याचे आवाहन पत्रातून रेल्वे बोर्डाला केले होते. त्यांनी पत्रातुन म्हटले होते की, जे काही  घडत आहे, त्याकडे गांभीर्यानं पाहावे आणि यामध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी सिस्टिमध्ये गंभीर त्रुटी असल्याचेही पत्रात म्हटले होते. गाडी सुरू झाल्यानंतर डिस्पॅच रूट बदलतो. सिग्नलशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कामे नवख्या कर्मचाऱ्यांकडे देण्यात येत असल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते, असेही ते म्हणाले. मात्र पत्र देऊनही कारवाई झाली नाही.

ओडिशा अपघात कसा झाला?
रेल्वेने सांगितले की, शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोरोमंडल एक्सप्रेस (ट्रेन नंबर 12481) बहानगा बाजार स्टेशनच्या (Shalimar-Madras) मेन लाइनवरून जात असताना ती रुळावरून घसरली आणि अप लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ट्रेन खूप स्पीडमध्ये होती, त्यामुळे 21 डबे रुळावरून घसरले आणि त्यातील 3 डबे डाउन लाइनवर गेले. बहानगा बाजार स्टेशनवर या गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे दोन्ही गाड्या स्पीडमध्ये होत्या. बहानगा बाजार स्टेशनवरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरल्यानंतर काही डबे मालगाडीला धडकले. दरम्यान, अपघाताच्या वेळी डाउन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसचे मागचे दोन डबेही रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या धडकेत आले.

First Published on: June 6, 2023 12:26 PM
Exit mobile version