‘वेळ आली तर शस्त्र हाती घेईन’, विकास दुबेच्या पत्नीचा इशारा!

‘वेळ आली तर शस्त्र हाती घेईन’, विकास दुबेच्या पत्नीचा इशारा!

विकास दुबे

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याचा एन्काउंटर झाला. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं. विकास दुबेच्या एन्काउंटर नंतर “परिणामी हाती बंदूकही घेईन,” अशी तीव्र प्रतिक्रिया विकास दुबेच्या पत्नीने दिली आहे.

विकास दुबेवर झालेल्या अंत्यसंस्कारानंतर विकास दुबे याच्या पत्नीनं माध्यमांनी राजकारण केल्याचा आरोप केला. विकास दुबेची पत्नी म्हणाली, “ज्यानं चूक केली त्याला शिक्षा मिळणार, हे मी सांगत आहे. गरज पडल्यास हाती बंदूकही घेईन,” अशी प्रतिक्रिया त्याच्या पत्नीनं दिली. त्याचबरोबर तीने प्रसार माध्यमांवर संताप व्यक्त केला. “आपल्या पतीनं चूक केली होती आणि पोलिसांनी जे काही केलं ते योग्यच केलं,” असंही ती यावेळी म्हणाली.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीसदेखील जाहीर करण्यात आलं होतं. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला होता. उत्तर प्रदेशची स्पेशल फोर्स टीम त्यांना मध्य प्रदेशच्या उजैवमधून कानपूर येथे आणत असताना गाडीचा अपघात झाला. या दरम्यान, विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि दुबेमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. त्यात तो मारला गेला.


हे ही वाचा – WHO ने केलं धारावी मॉडेलचं कौतुक, यामुळे कोरोना व्हायरस येऊ शकतो नियंत्रणात!


 

First Published on: July 11, 2020 12:32 PM
Exit mobile version