चिमुकली ओलिम्पिया झाली आहे ‘ब्रँड’

चिमुकली ओलिम्पिया झाली आहे ‘ब्रँड’

'ओलिम्पिया'चे इन्स्टाग्राम अकाऊंट

हल्ली फुकट पब्लिसिटी मिळवून देण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे ‘सोशल मीडिया’. त्यातल्या त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा विषय. अगदी कोणाच्याही फोनमध्ये तुम्ही डोकावलत तर तुम्हाला प्रत्येक जण या सोशल मीडियावर कोणाचे तरी फोटो पाहताना, लाईक करताना दिसतात. पण आता हा सोशल प्लॅटफॉर्म ‘ब्रँड’ घडवण्याचे काम करत आहे. जर तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल तर तुम्हाला अॅलिस ओलिम्पिया ओहायन ज्यूनिअर माहित नसेल तर नवलचं! कारण ‘या’ चिमुकलीचे ३ लाख ८७ हजार फॉलोवर्स आहे. आणि तुम्ही तिला फॉलो करत असाल तर तुम्हाला ब्रँड काय ते नक्कीच कळाल असेल.

कोण आहे ओलिम्पिया ?

ओलिम्पिया ही सुप्रसिद्ध टेनिस प्लेअर सेरेना विल्यम आणि अॅलेक्सिस ओहायनची मुलगी आहे. सप्टेंबरला या चिमुकलीचा जन्म झाला आणि अवघ्या काहीच दिवसात ती सोशल मीडियावर हिट झाली. ते झालं असं की, सेरेनाने चक्क तिच्या नावाचे इनस्टा अकाऊंट तयार केले. १४ सप्टेंबरला तिचा पहिला फोटो शेअर केला आणि त्याला चक्क ६७ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले. इतके लाईक्स असल्यावर कमेंटबाबत तर विचारायला नकोच नाही का!

 जन्मल्यानंतर काहीच दिवसात सेरेनाने ‘ओलिम्पिया’ने शेअर केलेला फोटो (सौ. Instagram)

हे आहे ओलिम्पियाचे ‘ऑफिशिअल’ अकाऊंट

फक्त ९ महिने वय असणाऱ्या ओलिम्पियाचे इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाईड आहे. जगभर तिचे ३ लाख ८७ हजार फॉलोवर्स आहेत. विशेष म्हणजे हे फॉलोवर्स तिच्या प्रत्येक फोटोवर कमेंट करत असतात. तिच्या प्रत्येक फोटोला ५० हजाराहून जास्त लाईक्स आहेत.

(वडील अॅलेक्स ओहानियासोबत ओलिम्पिया)

‘वोग’च्या कव्हरवर झळकली ओलिम्पिया

फॅशन, ब्युटी आणि कल्चरल गोष्टीसाठी ‘वोग’ हे प्रसिद्ध आहे. सेलिब्रिटी या मासिकाच्या कव्हर पेजवर येण्यासाठी सतत चर्चेत राहत असतात. त्यातल्या त्यात आंतरराष्ट्रीय ‘वोग’ ची ख्याती वेगळीच आहे. या मासिकाच्या कव्हरवर सेरेना सोबत तिची नन्ही परी ओलिम्पिया झळकली आहे. आता वोग मासिकाच्या कव्हरवर आई सेरेना सोबत झळकल्यानंतर हिट होणार हे नक्कीच ! असे तुम्हाला वाटले असेल. पण ओलिम्पियाने स्वत:चा असा फॅन फॉलोविंग आतापासूनच तयार केला आहे. त्यामुळे ती एक सेलिब्रिटी चाईल्ड नाही तर एक ब्रँड बनली आहे.

(वोगवर आई सेरेनासोबत ओलिम्पिया)

 

 

First Published on: June 22, 2018 6:08 PM
Exit mobile version