Coronavirus : कोरोनाचा अंत होऊ शकतो पण त्यासाठी कराव्या लागतील ‘या’ दोन गोष्टी

Coronavirus : कोरोनाचा अंत होऊ शकतो पण त्यासाठी कराव्या लागतील ‘या’ दोन गोष्टी

corona कोरोनाचा अंत होऊ शकतो पण त्यासाठी कराव्या लागतील 'या' दोन गोष्टी

देशात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. अशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे जवळपास 1,94,720 नवे रुग्ण आढळून आले असून संसर्गाचा दर 11.05 टक्क्यांवर पोहचला आहे. तर देशात ओमिक्रॉनचे जवळपास 4868 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. कोरोनाच्या या नव्या लाटेला रोखण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील सर्वच देशांना लसीकरणावर भर देण्याचे आवाहन केले आहे. तसेच WHO ने हा संसर्ग रोखण्यासाठी दोन महत्त्वाच्य गोष्टी नमूद केल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना महामारी रोखणे शक्य आहे मात्र त्यासाठी आवश्यक पाऊले उचलणे गरजेचे आहे. या संसर्गाचा अंत करण्यासाठी जगातील सर्व सरकार आणि लस उत्पादकांना दोन गोष्टींवर भर द्यावा लागेल. यातील पहिली गोष्ट म्हणजे ज्या देशांत कोरोनाविरोधी लस पोहचत नाही परंतु तिथे कोरोनाची जोखिम अधिक आहे अशा देशांमध्ये लसीचा पुरवठा अधिक वाढवायला हवा, तर दुसरी गोष्ट म्हणजे, लोकांना लस देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संसाधनांची उपलब्धता वाढवणे. कारण जोपर्यंत आपण सुरक्षित नाही तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही.


जागतिक आरोग्य संघटनेने पुढे म्हटले की, कोणताही देश कोरोना महामारीपासून वाचू शकला नाही. आमच्याकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी अनेक नवीन पद्धती आहेत. लसीकरणामधील असमानता जितकी जास्त काळ राहिल तितकी जोखिम अधिक वाढणार आहे. त्यामुळे लसीकरणामधील असमानता जेव्हा आपण संपवू तेव्हा आपण महामारीला रोखू शकतो. असे नमूद केले.

WHO च्या प्रमुखांनी पुढे म्हटले की, कोरोना महामारीने तिसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे. जर सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर आपण कोरोना महामारीला यावर्षात संपवू शकतो. त्यामुळे 2022 च्या मध्यापर्यंत सर्व देशांनी 70 टक्के लोकांचे लसीकरण करण्याचे जागतिक उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व देशांनी एकत्र मिळून काम करणे गरजेचे आहे.


Omicron : प्रत्येकाला ओमिक्रॉनचा संसर्ग होणार, बूस्टर डोसही ठरेल निष्क्रिय; आरोग्य तज्ज्ञांचा दावा


First Published on: January 12, 2022 3:12 PM
Exit mobile version