Omicron Variant: ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BA.2 मुळे वैज्ञानिकांमध्ये दहशत! भारतासह ४० देशांमध्ये धोक्याची घंटा

Omicron Variant: ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BA.2 मुळे वैज्ञानिकांमध्ये दहशत! भारतासह ४० देशांमध्ये धोक्याची घंटा

Omicron Variant: ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BA.2 मुळे वैज्ञानिकांमध्ये दहशत! भारतासह ४० देशांमध्ये धोक्याची घंटा

सध्या देशातील लोकं कोरोना आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनसोबत सामना करत आहेत. परंतु आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सबव्हेरिएंट म्हणजे उपप्रकार जन्माला आला आहे. या सबव्हेरिएंटचे नाव BA.2 असे देण्यात आले असून यामुळे जगातील चिंता आणखीनच वाढली आहे. भारतात या व्हेरिएंटचे ५३० नमुने नोंदवले गेले आहेत. ओमिक्रॉनच्या या नव्या सबव्हेरिएंटने ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला आहे. परंतु आतापर्यंत भारतात याचा धोका वाढला आहे. हा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनपेक्षा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे. ब्रिटनची हेल्थ प्रोटेक्शन एजेंसी (UKHSA) म्हणाले की, ओमक्रॉनचा धोका हा प्रौढांमध्ये कमी आहे.

ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजेंसीने जानेवारी महिन्यांच्या पहिल्याच दहा दिवसांत ब्रिटनमध्ये BA.2च्या ४२६ नमुन्यांची तपासणी केली आणि इशारा दिला की, जवळपास ४० देशांमध्ये ओमिक्रॉनचा नवा सबव्हेरिएंट पसरला आहे. ब्रिटनच्या लंडन शहरात ओमिक्रॉनच्या नव्या सबव्हेरिएंटच्या सर्वाधिक १४६ केसेसची नोंद केली गेली आहे. यामध्ये भारत, डेनमार्क आणि स्वीडनसारख्या देशांमधून आलेले सर्वाधिक केसेस आहेत.

युकेएचएसएचे संचालक डॉ. मीरा चंद म्हणाल्या की, ‘ओमिक्रॉन सातत्याने म्युटेट होणार व्हेरिएंट आहे. त्यामुळे आम्ही जिनोम सिक्वेंसिंगवर सातत्याने नजर ठेवू आहोत आणि धोकादायक पातळीला ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत. BA.2 सबव्हेरिएंटचे ५३ नमुने आहे, जे सर्वाधिक संसर्गजन्य आहेत.’

यापूर्वी काही दिवसांपूर्वी इस्रायलमध्ये ओमिक्रॉनचा नवा सबव्हेरिएंट आढळला होता. द टाईम्स ऑफ इस्रायलच्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये ओमिक्रॉनचा नव्या सबव्हेरिएंटचे २० केसेस आढळल्या आहेत. सध्या BA.2 व्हेरिएंट ओमिक्रॉनपेक्षा किती धोकादायक आहे, हे साध्य झाले नाही. पण ब्रिटनमध्ये सांगितले जात आहे की, हा व्हेरिएंट सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक आहे. डेनमार्कमध्ये BA.2 वेगाने पसरत आहे. माहितीनुसार, २०२१ शेवटच्या आठवड्यात कोरोना केसेसमध्ये हा सबव्हेरिएंट २० टक्के होता. जो २०२२च्या दुसऱ्या आठवड्यात वाढून ४५ टक्के झाला आहे.


हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनचा कहर! न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचं लग्न केलं रद्द


 

First Published on: January 23, 2022 1:42 PM
Exit mobile version