घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनचा कहर! न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचं लग्न केलं रद्द

Omicron Variant: ओमिक्रॉनचा कहर! न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचं लग्न केलं रद्द

Subscribe

देशातील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान जॅसिंड यांनी चिंता व्यक्त केली आहे.

जगभरात कोरोना महामारीसोबत लढाई अजूनही सुरू आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जात आहे. त्यामुळे अनेक कामकाज आणि कार्यक्रम रद्द केले जात आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा काही देशांमध्ये कहर सुरू आहे. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी न्यूझीलँडमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. याचे सक्त पालन करून न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी स्वतःचे लग्न रद्द केले आहे.

माध्यमासोबत बातचित करताना जॅसिंडा आर्डर्न म्हणाल्या की, ‘देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेस कमी करण्यासाठी कडक निर्बंध लावले जात आहेत. देश कोरोना संरक्षण नियमा अंतर्गत एका लाल सेटिंगमध्ये जाईल, ज्यामध्ये लोकांना मास्क घालणे सक्तीचे असेल. इनडोअर असे बार, रेस्टॉरंच आणि लग्नासारख्या कार्यक्रमांना १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. तसेच जे कार्यक्रम विना लसीकरण पास असेल तर त्या कार्यक्रमाला २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. कडक निर्बंध लागू करत असल्यामुळे माझे लग्नही रद्द करण्यात आले आहे.’

- Advertisement -

देशातील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान जॅसिंड यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच लग्न केव्हा असणार आहे, याबाबत कोणताही खुलासा त्यांनी केलेला नाही, फेब्रुवारी महिन्यांच्या अखेरपर्यंत नवे निर्बंध लावले गेले आहेत.

- Advertisement -

बऱ्याच काळापासून पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांचे जोडीदार आणि फिशिंग-शोचे होस्ट क्लार्क गेफोर्ड आहेत. त्यांच्यासोबत लग्न रद्द केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आर्डर्न म्हणाल्या की, ‘हे असे जीवन आहे. हजारो न्यूझीलंडच्या लोकांपेक्षा मी वेगळी नाही. ज्यांनी महामारीचे विनाशकारी परिणाम अनुभवले आहेत, त्यापैकी सर्वात दुःखदायक म्हणजे एखाद्या प्रिय व्यक्तीला गंभीर आजारी असताना त्याच्यासोबत राहणे शक्य नसणे. त्यामुळे लग्न रद्द करण्याच्या निर्णय हा या अनुभवाच्या दुःखांपेक्षा दूर आहे.’


हेही वाचा – India Corona Update: देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घट; २४ तासांत ३,३३,५३३ नव्या रुग्णांची नोंद, ५२५ जणांचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -