Omicron Variant : ओमिक्रॉनची दहशत! इस्राईलने अनेक देशांना केले रेड लिस्ट, तर अमेरिकन प्रवासावर बंदीची शक्यता

Omicron Variant : ओमिक्रॉनची दहशत! इस्राईलने अनेक देशांना केले रेड लिस्ट, तर अमेरिकन प्रवासावर बंदीची शक्यता

Omicron Variant : ओमिक्रॉनची दहशत! इस्राईलने अनेक देशांना केले रेड लिस्ट, तर अमेरिकन प्रवासावर बंदीची शक्यता

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान इस्त्राईलने अनेक देशांना रेड लिस्ट यादीत टाकले आहे. तर देशातील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवासावरही निर्बंध आणण्याचा विचार केला आहे. यासंदर्भात एक सखोल चर्चा झाली आहे. इस्राईल आरोग्य मंत्रालयाने रविवारी इस्राईल नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवासावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. देशात ओमिक्रॉन रुग्णसंख्या रोखण्यासाठी इस्त्राईल सरकारने अनेक युरोपीय देशांना आपल्या कोव्हिड १९ रेड लिस्टमध्ये टाकले आहे.

प्रवास निर्बंध होणार आणखी कठोर

इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होतोय. अशा परिस्थितीत प्रवासावरील बंदी आणखी कडक केली जाईल. पंतप्रधान बेनेट यांनी पुन्हा लॉकडाऊनवर बोलताना सांगितले की, पुढील लॉकडाउन टाळण्यासाठी इस्त्राईलमध्ये प्रवासावरील निर्बंध आणखी कठोर करत आहोत. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर लगेचच, इस्राईल देशाने प्रसार काही प्रमाणात रोखण्यासाठी प्रवासावर अंकुश ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला.

इस्स्राईलने रेड लिस्ट केलेले देश

इस्राईलच्या संसदेने रविवारी फ्रान्स, आयर्लंड, नॉर्वे, स्पेन, फिनलँड, स्वीडन आणि संयुक्त अरब अमिराती येथे प्रवास करण्यापासून देशातील नागरिकांना आणि रहिवाशांना प्रतिबंधित करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आधीच्या शिफारशीला मान्यता दिली आहे. इस्त्राईलच्या Covid 19 रेड लिस्टमध्ये ब्रिटन आणि डेन्मार्कचा आधीच समावेश केला होता. आरोग्य मंत्रालयाने यानंतर अमेरिकेसह कॅनडा, बेल्जियम, इटली, जर्मनी, हंगेरी, मोरोक्को, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि तुर्की अशा अनेक देशांना रेड लिस्टमध्ये समाविष्ट केले.

मुलांच्या लसीकरणावर भर देण्याची मागणी

इस्त्राईलमध्ये सध्या इस्त्राईल नागरिक आणि परदेशातून पुन्हा मायदेशात परतलेल्या रहिवाशांना एका आठवड्यासाठी क्वारंटाईन केले जात आहे. सर्व देशांतील अनिवासी परदेशी लोकांना विशेष परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई केली जातेय. त्याचबरोबर पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी इस्राईल नागरिकांना घरून काम करण्याचे आवाहन केले तसेच पालकांना त्यांच्या मुलांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे.


Cold Wave : राजस्थान, दिल्ली, पंजाबसह अनेक राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तराखंडात बर्फवृष्टी


First Published on: December 20, 2021 9:51 AM
Exit mobile version