घरदेश-विदेशCold Wave : राजस्थान, दिल्ली, पंजाबसह अनेक राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तराखंडात...

Cold Wave : राजस्थान, दिल्ली, पंजाबसह अनेक राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तराखंडात बर्फवृष्टी

Subscribe

उत्तर भारतात तापमानाचा पारा घसरला असून हाडं गोठवणाऱ्या थंडीची लाट आली आहे. राजस्थानच्या चुरुमध्ये आज उणे २.६ सेल्सिअर तापमानाची नोंद झाली आहे. तर राजधानी दिल्लीतही थंडी अधिक वाढतेय. दिल्ली सध्या १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंड वारे वाहत असल्याने नागरिकांना हुडहुडीचा सामना करावा लागतोय. याशिवाय पुढील काही दिवस दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट- बालटिस्ताना आणि मुजफ्फराबाद, उत्तराखंड या भागांत थंड वारे वाहणार आहेत अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

सध्या हिमाचाल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंडच्या काही भागात आणि २३, २४ डिसेंबरला पंजाब आणि हरिणायामध्ये कडाक्याच्या थंडीचा कहर सुरु आहे, तर अमृतसरमध्ये तापमान किमान -०.५ अंश सेल्सिअस झाले आहे तर चंदीगडमध्ये ३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

राजस्थानमधील फतेहपूर आणि चुरूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान मोठ्या प्रमाणात घसरले. रविवारी फतेहपूरमध्ये -२.५ अंश सेल्सिअस त्यानंतर करौलीमध्ये -०.६ अंश सेल्सिअस आणि चित्तोडगडमध्ये -०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशात रविवारी एका दशकातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, रविवारी पारा ४ अंशावर घसरल्याने भोपाळमध्ये ५५ वर्षांतील सर्वात थंड रात्र नोंदवली गेली, तर ग्वाल्हेरमध्ये पारा १.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यात राजधानी दिल्लीत थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तराखंडातही थंड लाटेचा इशारा देण्यात आला आहे. १९ ते २१ डिसेंबरदम्यान विशेषत: हरिद्वार आणि उमध सिंग नगरमध्ये हाडे गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे.

हिमाचलमध्ये हवामान आणखी थंड होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, बिहारमध्येही थंडी वाढली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत थंडीची लाट पाहता यलो अलर्ट ३ दिवस कायम राहणार आहे.


ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज न्यायालयात सुनावणी, कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई होणार?


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -