Omicron Variant Test : ओमिक्रॉन चाचणीच्या पहिल्या Omisure किटला ICMR ने दिली मान्यता

Omicron Variant Test : ओमिक्रॉन चाचणीच्या पहिल्या Omisure किटला ICMR ने दिली मान्यता

Omicron Variant Test : ओमिक्रॉन चाचणीच्या पहिल्या Omisure किटला ICMR ने दिली मान्यता

देशात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये दिवसाला 40 च्या आसपास ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांसह, इमारती, झोपडपट्टी परिसरात कोरोना चाचण्या सुरु आहेत. मात्र चाचण्या अधिक वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. (Omicron Variant Testing Kit) अशातच ICMR ने ओमिसुर (Omisure) या पहिल्या ओमिक्रॉन डिटेक्शन किटला मान्यता दिली आहे. या किटमुळे आता ओमिक्रॉन संसर्ग ओळखणे सहज सोप्पे होणार आहे. टाटा मेडिकलने या किटची निर्मिती केल्याची माहिती ICMR ने दिली आहे. (Omisure kit)

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मेडिकलच्या (Tata Medical & Diagnostics) या किटला 30 डिसेंबरला मंजुरी देण्यात आली होती. परंतु देशात सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी परदेशी किटचा वापर केला जातोय.

भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 1892 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 766 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक म्हणजे 568 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर दिल्लीत 382, केरळ 185, राजस्थान 174, गुजरात 152 तामिळनाडूत 121 रुग्ण आढळून आले आहेत.

भारतात सोमवारी दिवसभरात जवळपस 37 हजार 379 नवे रुग्ण आढळून आले. तर 11 हजार 7 कोरोनामुक्त लोकांना घरी सोडण्यात आले. दिलासाजनक बाब म्हणजे भारतात कोरोना मृतांचा आकडा कमी होतोय. सोमवारी देशात 124 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे सध्या दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रेट हा 3.24 टक्के झालाय. तर सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 830 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण 3 कोटी 43 लाख 6 हजार 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत कोरोनामुळे 4 लाख 82  हजार 17 जणांचा मृत्यू झाला आहे.


Corona : कोरोनाची तिसरी लाट आलीच ! टास्क फोर्सचा मोठा खुलासा


First Published on: January 4, 2022 11:33 AM
Exit mobile version