End of Pandemic : ओमिक्रॉनच कोरोनाची महामारी संपवणार ! संसर्गच ठरणार बुस्टर, लॉजिक वाचा

End of Pandemic : ओमिक्रॉनच कोरोनाची महामारी संपवणार ! संसर्गच ठरणार बुस्टर, लॉजिक वाचा

जगभरासह भारतात ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे covid-19 च्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यासोबतच कोरोनाची जगभरातील आकडेवारीही नव्या व्हेरीएंटमुळे वाढताना दिसते आहे. त्यामुळेच आता २०२२ वर्ष कसे असेल याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंतची दिलासादायक गोष्ट म्हणजे ओमिक्रॉनमुळे आजाराची सौम्य लक्षणे असतात. तसेच मृत्यूदर आणि हॉस्पिटलमध्ये रूग्ण दाखल करण्याचा दरही कमी आहे. पण नव्या व्हेरीएंटच्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतो आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या आव्हानाच्या काळात मनुष्यबळ हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभव लक्षात घेतला तर ज्या वेगाने कोरोनाचे आकडे वाढले त्याच वेगाने हे आकडे कमीदेखील झाले. त्यामुळेच कोरोनाचा प्रभाव संसर्गासाठी असला तरीही आजारपण हे सौम्य पद्धतीचे राहते ही बाब यामधून दिसून आली आहे, असे मत दिल्लीच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ शमशेर द्विवेदी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग हा एकीकडे वेगवान असला तरीही दुसरीकडे मात्र कोरोनाची महामारी संपुष्टात आणण्यासाठी हाच संसर्ग मदतीचा ठरणार आहे, असे संसर्गजन्या आजाराच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोना महामारीच्या शेवटाला सुरूवात ?

ओमिक्रॉन हा कोरोनाच्या महारीला संपुष्टात आणण्यासाठी मदत करणार असल्याचे मत कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ मोनिका गांधी यांनी म्हटले आहे. कोरोनाचे संसर्ग हा वेगवाग असला तरीही लसीकरण पूर्ण झालेल्या रूग्णांमध्ये या आजाराची सौम्य अशा पद्धतीचा संसर्ग आहे. बुस्टर डोस घेतलेल्यांनाही संसर्गाचा परिणाम तितकासा नसल्याचे मत त्यांनी मांडले. पण याआधीच्या व्हेरीएंटपेक्षा ओमिक्रॉन हा फुफ्फुसाला संसर्गाद्वारे बाधित करत नाही, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. त्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंग, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन तसेच प्राण्यांवर आधारीत अनेक अभ्यासांचाही समावेश आहे. ओमिक्रॉनचा व्हेरीएंट हा इतर व्हेरीएंटविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळेच ओमिक्रॉनचा संसर्ग हा सौम्य आहे. परिणामी ज्यांचे लसीकरण झाले आहे, अशा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग आणि धोका हा सौम्य असतो. त्यामुळेच ओमिक्रॉनपेक्षाही इतर कोणताही शक्तीशाली व्हेरीएंट जोवर समोर येत नाही, तोवर ओमिक्रॉनचा व्हेरीएंटच या महामारीपासून जगाला बाहेर काढू शकेल असाही विश्वास डॉ मोनिका गांधी यांनी व्यक्त केला.

कोरोना संपुष्टात येईल या शक्यतेला विरोध करणारेही मत समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसविरोधी इम्युनिटी आहे खरी, पण छोट्या मुलांचे लसीकरण झालेले नाही, हीदेखील वास्तव आहे. त्यामुळेच कोरोना महामारी संपुष्टात येईल हा अल्पकालीन असा आशावाद असल्याचे मत पुण्यातील इम्युनोलॉजिस्ट डॉ विनिता बाळ यांनी व्यक्त केले.

डॉ द्विवेदी म्हणाले की, कमी गांभीर्य असलेला आजार म्हणून ओमिक्रॉनकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच याआधीच्या व्हेरीएंटने रक्ताच्या गुठळ्या आणि स्ट्रोक्स आल्याचे समोर आले होते. थंडीच्या कालावधीत ह्दयविकाराचा झटका हा प्रकार सामान्य आहे. त्यामुळेच अतिउच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना या संसर्गाचा धोका अधिक असल्याचे डॉ द्विवेदी म्हणाले.


 

First Published on: January 10, 2022 8:09 PM
Exit mobile version