कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा दुप्पट वेगानं ऑमिक्रॉनचा फैलाव, WHO चा इशारा

कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा दुप्पट वेगानं ऑमिक्रॉनचा फैलाव, WHO चा इशारा

Omicron : ५ ते १४ वयोगटातील मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका, WHO चा इशारा

ऑमिक्रॉन जगभर पसरण्याची शक्यता WHO कडून देण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरियंट हा ऑमिक्रॉनपेक्षाही अत्यंत धोकादायक असल्याचं WHO ने म्हटलं आहे. कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षाही ऑमिक्रॉनचा दुप्पट वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे ऑमिक्रॉनला गांभीर्याने घ्या. नाहीतर गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागणार असल्याचा इशारा WHO ने दिला आहे.

ऑमिक्रॉन कोरोनापेक्षाही ६ पट धोकादायक आहे. तसेच संपूर्ण जगभर वेगानं पसरण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. कोरोनाची लस घेतलेल्या लोकांनी देखील ऑमिक्रॉनची लागण होऊ शकते. असं म्हटलं जातंय. ज्यांना कोरोना होऊन गेला असेल अशा लोकांना ऑमिक्रॉनच्या गंभीर परिणामांची भिती आहे. ऑमिक्रॉनमुळे इतर गंभीर आजारांना तोंड द्यावं लागण्याची भिती वर्तवली जात आहे.

ऑमिक्रॉन व्हेरियंट घातक आहे. मात्र घाबरण्याची गरज काहीही गरज नाही. कारण भारतात अद्याप एकही ऑमिक्रॉनचा रूग्ण आढळलेला नाहीये. अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत यांसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच व्हेरियंटचा धोका पाहता संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

ऑमिक्रॉनचा धोका आतापर्यंत संपूर्ण जगभरातील १६ देशांमध्ये ऑमिक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, ब्रिटन, नेदरलँड, जर्मनी, हॉंगकाँग, इटली, बेल्जिअम, इस्रालय, डेन्मार्क आणि इतर देशातील काही शहरांमध्ये त्याचा समावेश आहे. दरम्यान, ऑमिक्रॉन विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेतील विमान प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत.


हेही वाचा : Omicron : भारतात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती


 

First Published on: November 30, 2021 7:26 PM
Exit mobile version