Happy Father’s Day 2019 : गुगलकडून ‘फादर्स डे’निमित्त खास डुडल

गुगलकडून ‘फादर्स डे’निमित्त खास डुडल

गुगलवर सातत्याने बदलणारे खास डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. आज गुगलने ‘फादर्स डे’निमित्त खास व्हिडिओ आणि डुडल तयार केले आहे. जून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डेम्हणून साजरा केला जातो. हा खास दिवस गुगलनेही एका अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. या वर्षी १६ जूनला फादर्स डे साजरा करण्यात येत आहे.

असे आहे फादर्स डेचे खास डुडल

डुडलमध्ये गुगलने वडील आणि मुलांच्या नात्यांची परिभाषा दाखवली आहे. यामध्ये तीन अॅनिमेटेड रंगीबेरंगी व्हिडिओ केले आहेत. या व्हिडीओमध्ये वडिलांसोबत मुलांची उपस्थिती दाखवण्यात आली आहे. तसेच वडिलांसोबत मुले मस्ती करताना दाखवण्यात आले आहे. तसेच वडिलांचा मुलांसाठी असणारा पाठिंबा डुडलमधून दाखवण्यात आला आहे. या आधी मदर्स डे’निमित्त गुगलने याच थीमवर आधारित डुडल तयार केले होते.

फादर्स डे’ असा सुरू झाला?

फादर्स डे हे अमेरिकेचे इनव्हेन्शन आहे. अमेरिकन सरकारतर्फे १९१३ मध्ये मदर्स डे अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. मात्र, त्यानंतर जवळपास ६० वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये फादर्स डेजाहीर करण्यात आला. पोर्तुगाल, इटली आणि स्पेनमध्ये १९ मार्च रोजी सेंट जोसेफच्या वाढदिवसाच्या दिवशी फादर्स डेसाजरा केला जातो. जिजसला माता मनणाऱ्या तिच्या नवऱ्याचा जन्मदिवस म्हणून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करतात. इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर जगातील जवळपास ७० देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला. त्याप्रमाणे यंदाचा जून महिन्याचा तिसरा रविवार आज असून आजच्या दिवशी ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे.


हेही वाचा – कसा कराल ‘फादर्स डे’

हेही वाचा – ‘माधवचा मला खूप अभिमान आहे’


 

First Published on: June 16, 2019 1:30 PM
Exit mobile version