Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल कसा कराल 'फादर्स डे'

कसा कराल ‘फादर्स डे’

जूनच्या तिसऱ्या आठवड्यातील रविवारी हा फादर्स डे साजरा करण्यात येतो. आपलं बाबांवर असलेलं प्रेम दर्शवण्याचा हा एक दिवस मिळतो. यावर्षी आपल्या वडिलांना आपल्याला काय गिफ्ट्स देता येतील ते जाणून घेऊया.

Related Story

- Advertisement -

सर्वात पहिला फादर्स डे १९१० मध्ये १९ जूनला वॉशिंग्टनमधील स्पोकेन शहरातील सोनोरा डॉडने केली. सोनोराच्या आईच्या मृत्युनंतर वडिलांनीच वाढवल्यामुळं मदर्स डे सारखाच फादर्स डे साजरा करावा अशा विचाराने फादर्स डे साजरा केला. तेव्हापासून जूनच्या तिसऱ्या आठवड्यातील रविवारी हा फादर्स डे साजरा करण्यात येतो. आपलं बाबांवर असलेलं प्रेम दर्शवण्याचा हा एक दिवस मिळतो. यावर्षी आपल्या वडिलांना आपल्याला काय गिफ्ट्स देता येतील ते जाणून घेऊया.

कॉम्बो गिफ्ट पॅक – बाजारात अनेक प्रकारचे कॉम्बो गिफ्ट पॅक मिळतात. यामध्ये आपल्या वडिलांसाठी स्पेशल कार्ड्स असतात, ज्यावर भावनिक संदेश लिहिलेला असतो. त्याशिवाय वडिलांच्या आवडीच्या काही गोष्टी घेऊन आपणही कॉम्बो पॅक बनवून घेऊ शकतो. ज्यामध्ये ग्रुमिंग किटपासून इतर वस्तूंचादेखील समावेश करता येऊ शकतो.

- Advertisement -

fathers-day - combo pack
फादर्स डे साठी कॉम्बो पॅक

हेल्थ केअर प्रॉडक्ट – आपल्या वडिलांना मधुमेह अथवा रक्तदाब यांसारखे आजार असल्यास, ते नियंत्रणात राहण्यासाठी अथवा त्यांचं नियंत्रण कसं ठेवता येईल यासाठी काही डिव्हाईस अथवा गॅझेट्स देता येतील. जेणेकरून त्यांना आपली शुगर वा रक्तदाब तपासण्यासाठी सतत डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. घरच्या घरी काळजी घेऊन आहारामध्ये बदल करता येईल.

- Advertisement -

health care products
हेल्थ केअर प्रॉडक्ट्स

चित्रपट अथवा बाहेरगावी जाण्यासाठी तिकिट्स – बऱ्याच दिवसांपासून जर तुमच्या आई-वडिलांना एकत्र वेळ मिळाला नसेल. तर त्यांच्यासाठी बाहेर जाण्याची योजना आखा अथवा त्यांच्यासाठी मुव्ही डेट फिक्स करता येईल. नव्या आलेल्या चित्रपटाची अथवा नाटकाची तिकिट्स काढून त्यांना हा आनंद नक्कीच देता येईल.

movie tickets
चित्रपटांची तिकिट्स

 

स्मार्टफोन – सध्या नवेनवे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. जर आपल्या वडिलांना नव्या तंत्रज्ञानाची आवड असेल आणि अपडेट राहायला आवडत असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या बजेटनुसारदेखील चांगले स्मार्टफोन बाजारामध्ये मिळतात. त्यांना आवडेल असा स्मार्टफोन त्यांना घेऊन देता येऊ शकतो.

smartphones
असे स्मार्टफोन्सदेखील देता येतील

फूटवेअर – बऱ्याचदा आपले वडील आपल्या पायांचीही नीट काळजी घेत नाही. वय होत जातं तसं पायांची जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळं ऑफिसला जात असतील तर त्याप्रमाणे अथवा घरी असतील तर त्याप्रमाणे चांगले फूटवेअर देऊ शकता. जेणेकरून त्यांचे पाय फुटणार नाहीत, मऊ राहतील याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल.

footwear
पायाला त्रास न होण्यासाठी फूटवेअर

- Advertisement -