या हॉटेलमध्ये जेवायचय? मग तोंड बंद ठेवा आणि गप्प गिळा !

या हॉटेलमध्ये जेवायचय? मग तोंड बंद ठेवा आणि गप्प गिळा !

तुम्ही जगभरातील विविध आणि विचित्र रेस्टाँरंटबद्दल ऐकल किंवा वाचलं असेल. काही ठिकाणी पाण्याखाली हॉटेल आहेत तर काही ठिकाणी डोंगराच्या टोकावर हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलची आपली अशी वेगळी वैशिष्टय आहेत. पण आता तुम्हांला आम्ही एका अशा रेस्टॉंरंटबदद्ल सांगणार आहोत जिथे एक शब्दही उच्चारण्यास मनाई असून तोंड बंद ठेवून जेवावे लागते. त्यातच जर तुम्हांला काही सांगायच असेल तर हातवारे करत वेटरबरोबर इशाऱ्यात बोलावे लागते. हे अजब हॉटेल चीनमधील ग्वांगझू येथे आहे. स्टारबक्सने ते सुरू केले आहे. ‘सायलेंट कॅफे’ असे त्याला नाव देण्यात आले आहे.

चीनमधील हे एकमेव असे हॉटेल आहे जिथे ग्राहक आणि रेस्टाँरंट कर्मचारी इशाऱ्यांमध्ये बोलतात. जेवणाची ऑर्डरही हातवारे करत इशाऱ्यात दिली जाते. जर तुमचा इशारा वेटरला कळाला नाही तरच मेन्यू कार्डवरील पदार्थाचा क्रमांक तुम्ही त्याला दाखवायचा. मग काही मिनिटांतच तुमचा आवडता पदार्थ तुमच्यापुढे येतो. अभूतपूर्व शांततेत तुम्ही मनसोक्त जेवता. एवढेच नाही तर बिलही डीजिटल द्यायची. रोख पैश्यांचे व्यवहार येथे होत नाही. कारण त्यात बोलावे लागते. नाण्यांचा आवाज येतो. नोट कागदाची असल्याने ती हाताळतांनाही आवाज येऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करण्याची येथे अट आहे.

रेस्टॉंरंटच्या भिंतीवर सांकेतिक भाषेत सूचना लिहण्यात आल्या आहेत. ज्या वाचल्यावर तुम्हांला बोलण्याची गरजच भासत नाही. तसेच शांततेत जेवल्याने दोन घासही पोटात जास्त जातात. असे या सूचनांमध्ये लिहण्यात आले आहे.

First Published on: January 27, 2020 7:15 PM
Exit mobile version