ट्रान्सप्लांट सर्जरीच्या रूग्णांना लसीकरण पुर्ण होऊनही कोरोनाचा धोका – संशोधन

ट्रान्सप्लांट सर्जरीच्या रूग्णांना लसीकरण पुर्ण होऊनही कोरोनाचा धोका – संशोधन

कोरोनाचे दोन डोस घेऊन लसीकरण पुर्ण झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याने ट्रान्सप्लांट फिजिशिअन चिंताग्रस्त झाले आहेत. काही अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार अवयवदानानंतर ट्रान्सप्लांट सर्जरी झालेल्या रूग्णांच्या बाबतीत लसीकरण पुर्ण झाल्यानंतरही पुरेशा प्रमाणात अॅन्टीबॉडिजची मदत ही कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे SARS-CoV-2 कोरोना व्हायरस विरोधी लढाईत हे लसीकरण तितकेसे परिणामकारक ठरत नसल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या व्हायरसविरोधात या एन्टीबॉडिज पुरेशा प्रमाणात प्रतिकार करण्यास उपयुक्त ठरत नसल्यानेच कोरोनाची लागण होण्याचा धोका असल्याची माहिती अभ्यासातून मांडण्यात आली आहे. सायन्स मॅगझिनने दिलेल्या वृत्तानुसार ट्रान्सप्लॅंट सर्जरी केलेल्या रूग्णांना लसीकरण पुर्ण झाल्यानंतरही अधिक धोका असल्याचे अहवालाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

ट्रान्सप्लांटच्या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळेच अनेकदा संसर्गाचा धोका अधिक वाढतो. एका अभ्यासासाच्या निमित्ताने ६५८ रूग्णांचा अभ्यास करण्यचात आला होता. त्यापैकी ५४ टक्के रूग्णांना लस देण्यात आली होती. कोरोनाविरोधी अॅन्टीबॉडिज तयार करण्यासाठी ही लस देण्यात आली होती. त्यामध्ये अनेक रूग्णांच्या बाबतीत कमी प्रमाणात निर्माण झालेल्या अॅन्टीबॉडिज या धोकादायक पद्धतीच्या अशा स्वरूपात आढळल्या. जरी हे धोक्याचे संकेत असले तरीही याचा अर्थ त्या अॅन्टीबॉडिज कोरोनाचा प्रतिकार करत नाही असा होत नाही, असे मत जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटीशी संलग्न असलेले ट्रान्सप्लांट सर्जन डॉरी सेगेव यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना लसीचा किती परिणाम हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी एका झालेल्या अभ्यासात एकुण १८ हजार पुर्ण लसीकरण झालेल्या रूग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये किडनी आणि फुफ्फुसाचे ट्रान्सप्लांट झालेल्या अमेरिकेतील केंद्रांचा समावेश आहे. या लसीकरण झालेल्या रूग्णांपैकी १५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. तसेच लागण झालेल्या रूग्णांपैकी निम्म्या लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये १० पैकी १ रूग्ण दगावल्याचा उल्लेख अभ्यासात करण्यात आला आहे. या अभ्यासातून स्पष्ट झालेला संसर्गाचा धोका ०.८३ टक्के इतके कमी असला तरीही हा धोका सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाच्या तुलनेत ८३ टक्के इतका आहे. या अभ्यासातूनच लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोनाच्या लसीचा अधिक धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जूनमध्ये न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार ६८ टक्के ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेल्या रूग्णांना फायझरच्या तिसऱ्या डोसनंतर एन्टीबॉडिज तयार होत असल्याचे समोर आले आहे. तर दोन डोस घेतलेल्या ४० टक्के नागरिकांमध्येही अॅन्टीबॉडिज तयार झाल्याचे समोर आले आहे. तर मॉडर्नाची लस घेतलेल्या १५९ रूग्णांमध्ये कोणत्याही अॅन्टीबॉडी तयार झाले नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. अनेक देशांमध्ये तिसऱ्या डोसची गरज अजुनही अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. पण अनेक देशांमध्ये यानिमित्ताने तिसऱ्या डोसचा विचार आता सुरू झाला आहे. या तिसऱ्या डोससाठी अनेक देशांमध्ये मान्यता मिळणे गरजेचे आहे.


 

First Published on: July 28, 2021 1:03 PM
Exit mobile version