तामिळ ब्राम्हण मुलांना नवरी मिळेना, थेट धाव घेतली उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये

तामिळ ब्राम्हण मुलांना नवरी मिळेना, थेट धाव घेतली उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये

तामिळ ब्राम्हण मुलांना नवरी मिळेना, थेट धाव घेतली उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. पण तामिळनाडूतील ब्राम्हण मुलांना नवरी मिळत नसल्याचे समोर आले आहे. तामिळनाडूच्या ४० हजारांहून अधिक तरुण तामिळ ब्राम्हणांना राज्यात नवरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता तामिळनाडू स्थित ब्राम्हण संघाने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राम्हण नवरी शोधण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. थमिजनाडू ब्राम्हण असोसिएशनचे (थंब्रास) अध्यक्ष एन नारायणन यांनी असोसिएशनच्या तामिळ मासिकेतील नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केलेल्या एका पत्रात म्हटले की, आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने एक विशेष चळवळ सुरू केली आहे.

नारायणन म्हणाले की, ३० ते ४० वयोगटातील ४० हजारांहून अधिक तामिळ ब्राम्हण पुरुष लग्न करू शकले नाहीत. कारण तामिळनाडूत ते स्वतःसाठी नवरी शोधू शकले नाहीत. अंदाजे आकडेवारी सांगत ते म्हणाले की, जर तामिळनाडूमध्ये विवाहयोग्य वयोगटातील १० ब्राम्हण मुले असतील तर याच वयोगटात फक्त सहा मुली उपलब्ध असतात.

असोसिएशनचे प्रमुखांनी या पत्रात म्हणाले आहेत की, ही मोहीम पुढे नेण्यासाठी दिल्ली, लखनऊ आणि पटना येथे समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हिंदी वाचणे, लिहिणे आणि बोलण्यास येणाऱ्या सक्षम व्यक्तीची संघटनेच्या मुख्यालयात समन्वयाची भूमिका बजवण्यासाठी निवडले जाईल. दरम्यान लखनऊ आणि पटणा येथील लोकं संपर्कात आले असून हा उपक्रम राबवला जाऊ शकतो. याबाबत मी काम सुरू केले आहे, असे थंब्रासने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – Rashtrapati Bhavan: नशेडी कपलची राष्ट्रपती भवनात एंट्री आणि मग…


First Published on: November 17, 2021 10:02 PM
Exit mobile version