Rashtrapati Bhavan: नशेडी कपलची राष्ट्रपती भवनात एंट्री आणि मग…

Security breach at rashtrapati bhavan, couple arrested
Rashtrapati Bhavan: नशेडी कपलची राष्ट्रपती भवनात एंट्री आणि मग...

दिल्लीतील अति सुरक्षित असलेल्या भवानांपैकी एक म्हणजे राष्ट्रपती भवन. पण राष्ट्रपती भवन येथील सुरक्षेत सोमवारी मोठी चुक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सुरक्षा एजन्सी धक्का बसला आहे. माहितीनुसार एक मुलगा आणि मुलगी रात्रीच्या वेळी थेट राष्ट्रपती भवनात घुसली. पण यादरम्यान तिथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोघांना पकडले. मुलगा गाडी चालवत होता आणि मुलगी बाजूला बसली होती. ही गाडी थेट राष्ट्रपती भवन गेट नंबर ३५ मधून घुसवली आणि तीन बॅरिकेड्स पार करून आत पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री जवळपास ९ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती भवनात कपल घुसले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांची चौकशी केली ज्यानंतर दोघांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर दोघांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली. सुत्रांच्या माहितीनुसार, घटनेदरम्यान दोघेही नशेत होते. घटनेनंतर तैनात असलेले सर्व कर्मचारी आश्चर्यचक्कीत झाले.

पण अजूनही अटक करण्यात आलेले कपल चुकून राष्ट्रपती भवनात घुसले की जाणूनबुजून हे स्पष्ट झाले नाही आहे. पोलीस सातत्याने चौकशी करत आहेत. तसेच राष्ट्रपती भवनातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. शिवाय सुरक्षेत तैनात असलेले जवान अजूनच अलर्ट मोड आले आहेत.


हेही वाचा – ड्रॅगनची नवी खेळी! भारताच्या सीमेवर हेलिकॉप्टरची फौज तयार करण्यात चीन दंग